Join us  

Shocking : सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण 

चौघांवर खासजी रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 12:13 PM

Open in App
ठळक मुद्देबंगाल क्रिकेट असोसिएशनचा सचिव आहे गांगुलीचे मोठे बंधूदेशातील कोरोना रुग्णांचा आकडा 4 लाखांच्या नजिक पोहोचला आहे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव स्नेहशीष गांगुली यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली. स्नेहशीष हे सौरव गांगुलीचे मोठे बंधू आहेत. स्नेहशीष यांची पत्नी, सासू आणि सासरे यांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. स्नेहशीष यांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीलाही कोरोना झाल्याचे नुकतेच समोर आले होते. 

या सर्वांवर मोमिनपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. स्नेहशीष हे माजी रणजीपटू आहेत आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना घरातच आयसोलेशन मध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. ''कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या चौघांना आरोग्याची समस्या जाणवू लागली. हे सर्व सौरव गांगुलीच्या घरात राहत नव्हते, ते दुसऱ्या घरात राहायचे. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले,''माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. शनिवारी त्यांची पुन्हा एकदा चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील उपचारांचा निर्णय घेतला जाईल.  

जगभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरात 87 लाख 66,035 कोरोना रुग्ण आढळले असून 46 लाख 27,883 रुग्ण बरे झाले आहेत. पण, दुर्दैवानं 4 लाख 62,691 रुग्णांना जीव गमवावा लागला. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 96,182 इतकी झाली असून 2 लाख 14,209 रुग्ण बरे झाले आहेत. 12970रुग्णांचे निधन झाले आहे.

बाबो; 20 सेकंदाचा 'सोपा' व्यायाम जमतो का बघा; हरभजन सिंगनं शेअर केलेला Video Viral

चिनी स्पॉन्सर्सबाबत IPL गव्हर्निंग काऊंसिल मोठा निर्णय घेणार? बोलावली तातडीची बैठक

युजवेंद्र चहल अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही; पोस्ट केला वेदनादायक फोटो

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासौरभ गांगुली