Sushant Singh Rajput Suicide: युजवेंद्र चहल अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही; पोस्ट केला वेदनादायक फोटो

सुशांत सिंग राजपूतनं राहत्या घरी आत्महत्या केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 10:52 AM2020-06-20T10:52:45+5:302020-06-20T10:56:01+5:30

whatsapp join usJoin us
Sushant Singh Rajput Suicide: Yuzvendra Chahal shares touching post about Sushant Singh Rajput | Sushant Singh Rajput Suicide: युजवेंद्र चहल अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही; पोस्ट केला वेदनादायक फोटो

Sushant Singh Rajput Suicide: युजवेंद्र चहल अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही; पोस्ट केला वेदनादायक फोटो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देएमएस धोनी;अनटोल्ट स्टोरी चित्रपटातील भूमिकेनं जिंकलेली सर्वांची मनं धोनीच्या बायोपिकमधील प्रमुख भूमिकेमुळे त्याचं क्रीडा विश्वाशी नातं जोडलं

सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या करून सर्वांनाचा मोठा धक्का दिला. सुशांतच्या जाण्यानं बॉलिवूडमधील गटबाजीच्या वादाला तोंड फुटले आहे. 'एम एस धोनी: दी अनटोल्ट स्टोरी' च्या निमित्तानं सुशांतचं क्रीडा विश्वाशीही नातं जोडलं गेलं होतं. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्यानं हुबेहुब पडद्यावर साकारला होता. त्यामुळे त्याच्या निधनानंतर क्रीडा विश्वातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही. त्यानं एक वेदनादायी फोटो पोस्ट करून त्याचं दुःख व्यक्त केलं.

सुशांच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील एक गट कारणीभूत आहे, अशी टीका अभिनेत्री कंगना रानौतनं केली होती. चहलनं कंगनाचा तो व्हिडीओ स्वतःच्या इंस्टा स्टेटसवर पोस्ट केला आहे.  34व्या वर्षी नैराश्याच्या गर्तेत सापडल्यानं सुशांतनं आत्महत्या केली. त्याच्या अचानक एक्झिटनं सर्वांच्या मनाला चटका लावला. चहलनं आणखी एक पोटो पोस्ट केला. त्यात सुशांतचा स्केच आहे आणि त्याच्या पाठीत अनेक खंजीर खुपसलेले दाखवले आहेत. त्यावर चहलनं नेपोटीझम, बॉलिवूड, बॅन, हरॅशमेंट, बॉयकॉट आदी नावं लिहिली आहेत. चहलनं शेअर केलेला फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांना अश्रू अनावर होत आहेत.  

सुशांतच्या निधनानंतर चहलनं त्याच्यासोबतचा फोटोही पोस्ट केला होता. भावा तुझी आठवण येईल, असे त्यानं लिहिलं होतं. चहलनं स्वतःचा DPवरही सुशांतचा फोटो ठेवला आहे.  काय पो छे या चित्रपटातून सुशांतनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यात त्यानं क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2016मध्ये त्याला धोनीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानं सर्वांचा विश्वास सार्थ ठरवला. धोनीची भूमिका साकारण्यासाठी सुशांतनं घेतलेली मेहनत पडद्यावर जाणवली. त्यानं माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.   

चिनी स्पॉन्सर्सबाबत IPL गव्हर्निंग काऊंसिल मोठा निर्णय घेणार? बोलावली तातडीची बैठक

Web Title: Sushant Singh Rajput Suicide: Yuzvendra Chahal shares touching post about Sushant Singh Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.