Join us

धक्कादायक! भारताच्या माजी फलंदाजावर लैंगिक अत्याचाराचा आरोप; प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी

भारतीय संघाचा माजी खेळाडू अतुल बेदाडेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. बडोदा महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी त्याच्यावर हे ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 14:08 IST

Open in App
ठळक मुद्देखेळाडूंच्या आरोपानंतर बडोदा क्रिकेट असोसिएशनने बेदाडेची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ५३ वर्षीय बेडादेने १९९४ मध्ये १३ सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

भारतीय संघाचा माजी खेळाडू अतुल बेदाडेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. बडोदा महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी त्याच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. खेळाडूंच्या आरोपानंतर बडोदा क्रिकेट असोसिएशनने बेदाडेची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वरिष्ठ महिला वन डे क्रिकेट स्पर्धा नुकतीच हिमाचल प्रदेश येथे पार पडली. त्यावेळी बेदाडेने महिला खेळाडूंशी गैरवर्तन केले. 

ESPNCricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार बडोदा क्रिकेट असोसिएशन आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक समिती नेमणार आहे. ५३ वर्षीय बेडादेने १९९४ मध्ये १३ सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्यानावावर एक अर्धशतक आहे. बेदाडेने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :लैंगिक छळहिमाचल प्रदेशनिलंबन