Vaibhav Suryavanshi Mobile Phone Live match, Rajasthan Royals IPL 2026: राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (ACU) एका गंभीर बाबीची दखल घेतली आहे. राजस्थान संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या साथीदाराने LIVE सामन्यात मोबाईल फोन वापरला. त्यामुळे त्याला मोठा दणका बसला. संघाचे मॅनेजर रोमी भिंडर डगआउटमध्ये म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्रात मोबाईल फोनचा वापर करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
भरसामन्यात वापरला मोबाईल, नेमका प्रकार काय?
आयपीएलच्या नियमांनुसार, सामना सुरू असताना डगआउट, ड्रेसिंग रूम किंवा 'PMOA' (Player and Match Officials Area) मध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा, विशेषतः मोबाईल फोनचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यादरम्यान रोमी भिंडर मोबाईलवर बोलताना किंवा चॅटिंग करताना एसीयूच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस पडले. भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे नियम अत्यंत कडक पाळले जातात. बीसीसीआयने या घटनेची गंभीर दखल घेत रोमी भिंडर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना ठराविक वेळेत यावर स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संघाची प्रतिमाही खराब होण्याची शक्यता
रोमी भिंडर हे राजस्थान रॉयल्स संघाशी अनेक वर्षांपासून जोडलेले आहेत. मात्र, अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे फ्रँचायझीच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. जर त्यांचे उत्तर समाधानकारक नसेल, तर त्यांच्यावर आर्थिक दंड किंवा काही सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते. आयपीएलमध्ये सट्टेबाजी आणि फिक्सिंगसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी बीसीसीआय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या मोबाईल वापरावर कडक निर्बंध लावते. सामना सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडूंचे मोबाईल फोन एसीयू कडे जमा केले जातात. अशा वेळी त्यांनी मोबाईल फोन कुठून आणला याची चर्चा रंगली आहे. तसेच या प्रकरणावर राजस्थान रॉयल्स संघाने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. रोमी भिंडर यांच्या स्पष्टीकरणानंतर बीसीसीआय अंतिम निर्णय घेणार आहे.