Join us  

धक्कादायक! क्रिकेट मंडळातील अधिकाऱ्यांनी केला भ्रष्टाचार; केली मोठी शिक्षा 

बांगलादेशच्या काही अनुभवी खेळाडूंनी भारताच्या दौऱ्यावर यायला नकार दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 2:52 PM

Open in App

मुंबई : राजकारण आणि खेळात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. आता तर क्रिकेट मंडळातही काही धक्कादायक गोष्टी पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेट मंडळातील दोन व्यक्तींना देश सोडण्याची मनाई करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यापूर्वी बांगलादेशचे खेळाडू आणि क्रिकेट मंडळ यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यामुळे बांगलादेशच्या काही अनुभवी खेळाडूंनी भारताच्या दौऱ्यावर यायला नकार दिला होता.

या दौऱ्यावर येण्यापूर्वी बांगलादेशला मोठा धक्का बसला तो कर्णधार शकिब अल हसनच्या रुपात. या दौऱ्यापूर्वी शकिबचे सट्टेबाजांशी संबंध होते, असे सर्वांपुढे आले आणि त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने घेतला. आता तर त्यांच्या क्रिकेट मंडळातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :बांगलादेशभारत विरुद्ध बांगलादेशभारत