Join us

सेमी फायनलपूर्वीच भारताला धक्का! पांड्या दुखापतीमुळे वर्ल्डकप स्पर्धेबाहेर, या खेळाडूला मिळाली संधी

हार्दिक सेमी फायनलपर्यंत बरा होईल अशी आशा होती. परंतू ती फोल ठरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 09:42 IST

Open in App

विश्वचषक स्पर्धा ऐन रंगात आलेली असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. याची माहिती आयसीसीने दिली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघाबाहेर होता. 

हार्दिक सेमी फायनलपर्यंत बरा होईल अशी आशा होती. परंतू ती फोल ठरली आहे. हार्दिक पंड्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. जसप्रीत बुमराहप्रमाणेच प्रसिद्धही जवळपास वर्षभर दुखापतग्रस्त होता. आशिया चषक स्पर्धेतही तो भारतीय संघाचा भाग होता. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय मालिका खेळला होता. त्यातही प्रसिद्ध संघामध्ये होता. 

प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी आतापर्यंत १७ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने २९ बळी घेतले आहेत. 12 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. परंतू दुखापतीनंतर त्याच्या जागी आलेल्या सिराजने संघात आपले स्थान पक्के केले आहे. यामुळे त्याला संधी मिळाली नव्हती.  

टॅग्स :हार्दिक पांड्यावन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघ