Join us

Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शोएब अख्तरचा भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा प्रस्ताव

2007नंतर भारत-पाकिस्तान मालिका झालेली नाही. उभय देश केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धांमध्ये किंवा आशिया चषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 17:50 IST

Open in App

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमधील द्वंद्व जगजाहीर आहे. पाकिस्तानातून दहशतवादी कुरापतींना मिळणाऱ्या खतपाणीमुळे भारतानं शेजाऱ्यांशी सर्व संबंध तोडले आहेत. त्यामुळेच उभय देशांमध्ये तेरा वर्षांपासून द्विदेशीय क्रिकेट मालिका झालेली नाही. पण, सध्या कोरोना व्हायरसनं जगाला वेठीस धरलं आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी भारत-पाकिस्ताननं क्रिकेट मालिका खेळवावी, असा प्रस्ताव समोर येत आहे. कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी भारत-पाक मालिका व्हावी, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं ठेवला आहे.

विराट कोहलीच्या मक्तेदारीला धक्का; इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं पटकावला सर्वोच्च मान

2007नंतर भारत-पाकिस्तान मालिका झालेली नाही. उभय देश केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धांमध्ये किंवा आशिया चषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. दोन देशांतील क्रिकेट सामन्यांना मोठा प्रतिसादही मिळतो. त्यामुळेच भारत-पाक मालिकेतून मोठा निधी उभा केला जाऊ शकतो आणि त्याचा दोन्ही देशांना फायदा होईल. त्यामुळेच पाकिस्तानी माजी गोलंदाज शोएब अख्तरनं मालिकेचा प्रस्ताव ठेवला आहे.

शिष्य असावा तर असा; व्हेंटिलेटरवर असलेल्या 'गुरू'साठी सौरव गांगुली धावला!

तो म्हणाला,''हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव मला ठेवायचा आहे. पण, या सामन्यातून दोन्ही देशांतील चाहते एकमेकांच्या पाठिशी उभे राहतील. विराटनं शतक झळकावलं तर आम्ही आनंद साजरा करू, तसेच बाबरनं शतक झळकावल्यास तुम्ही आनंद साजरा करा. मैदानावरील निकालापेक्षा दोन्ही सघ विजयी ठरतील.''

''या सामन्याला मोठी व्ह्यूअर्सशीप मिळेल. इतिहासात प्रथमच दोन्ही संघ एकमेकांसाठी खेळतील. यातून उभा राहणारा निधी दोन्ही देशांना समान दिला जाईल,'' असेही अख्तर म्हणाला.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'त्या' एका निर्णयामुळे भारतीय खेळाडूवरील संकट टळलं!

15 वर्षीय खेळाडूनं विकल्या त्याच्याकडच्या 102 ट्रॉफी; जमा केलेला निधी केला दान

इंग्लंडच्या खेळाडूनं वर्ल्ड कप जर्सी लाखांत विकली; हॉस्पिटल्सना केली मदत 

क्वारंटाईनमुळे पाकिस्तानी खेळाडूची झाली अशी अवस्था; पाहा Video

क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का; Corona Virusनं घेतला दिग्गज खेळाडूचा जीव 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारत विरुद्ध पाकिस्तानशोएब अख्तर