Join us  

शोएब अख्तर भडकला; ICCवरच केला गंभीर आरोप 

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सध्या त्याच्या वाचाळ वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 2:49 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सध्या त्याच्या वाचाळ वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. यावेळी त्यानं थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी) लक्ष्य केले असून त्यानं गंभीर टीका केली. आयसीसीनं अख्तरच्या एका वक्तव्याची खिल्ली उडवली होती. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला चौथ्या चेंडूवर बाद करेन, असा दावा अख्तरनं केला होता. त्यावरून आयसीसीनं पाकिस्तानी गोलंदाजाची फिरकी घेतली. अख्तरला ही मस्करी आवडली नाही आणि त्यानं आयसीसीवर गंभीर आरोप केला. आयसीसी पक्षपात करत असल्याचा आरोप त्यानं केला. 

अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स; ब्लॅकमेलरच्या हाती लागला Sex Video अन्... 

विराट कोहली-अनुष्का शर्माचे क्वारंटाईनमधील CanDid फोटो व्हायरल

ESPN Cricinfo'sच्या एका ट्विटवर अख्तरनं स्मिथला चौथ्या चेंडूवर बाद करण्याचा दावा केला.  अख्तरनं 46 कसोटी आणि 163 वन डे साममन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 178 आणि वन डेत 247 विकेट्स घेतल्या होत्या. 2011मध्ये निवृत्ती घेणाऱ्या अख्तरनं 15 ट्वेंटी-20 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या आहेत.  त्यावरून आयसीसीनं  पाकिस्तानी गोलंदाजाला ट्रोल केलं होतं.वीरू, गंभीरला शिवीगाळ करू शकतो, पण...; Shoaib Akhtar पुन्हा बरळलासोमवारी अख्तरनं भारताचा माजी सलामीवीर वीरूला खोटारडा म्हटलं होतं. पाकिस्तान दौऱ्यावर वीरूनं तिहेरी शतक झळकावलं होतं. त्यावेळचा 'बाप बाप होता है!' हा किस्सा वीरूनं अनेकदा सांगितला. त्यावरून अख्तरनं भारतीय फलंदाजाला खोटारडा ठरवलं. उलट वीरू जेव्हा प्रत्यक्ष भेटला तेव्हा असं काही न म्हटल्याचं त्यानं सांगितलं. यावरूनच टीव्हीसमोर आल्यावर तो काहीही बोलतो हे स्पष्ट होतं, असं अख्तर म्हणाला.

तो पुढे म्हणाला,''सेहवाग आणि गंभीर ही चांगली माणसं आहेत. पण, जेव्हा ते टीव्हीसमोर येतात तेव्हा जे तोंडात येईल ते बरळतात. मीही त्यांच्याप्रती अपमानजनक वक्तव्य करू शकतो आणि शिवीगाळही करू शकतो, परंतु मी असं करत नाही. कारण, लहान मुलंही कार्यक्रम पाहतात.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँमुळे मोठा धक्का; यंदाही मिळणार नाही अर्जुन पुरस्कार 

Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर!

 जगायचं तरी कसं? लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या खेळाडूवर उपासमारीची वेळ

हार्दिक पांड्याच्या रोमँटिक उत्तरानं नताशा लाजली; TikTok व्हिडीओतून व्यक्त केल्या भावना

Video : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाचं फुटबॉल कौशल्य पाहा; म्हणाल क्या बात, क्या बात...

टॅग्स :शोएब अख्तरआयसीसीस्टीव्हन स्मिथ