Join us  

...तर वसीम अक्रमची हत्या केली असती, शोएब अख्तरचं खळबळजनक विधान

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर वादग्रस्त विधानानं नेहमी चर्चेत राहीला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 4:50 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर वादग्रस्त विधानानं नेहमी चर्चेत राहीला आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीनं प्रतिस्पर्धी फलंदाजाला असह्य करणाऱ्या अख्तरनं एक खळबळजनक विधान केलं आहे. पाकिस्तानचा महान गोलंदाज आणि माजी कर्णधार वसीम अक्रम यांच्याबद्दलचं हे विधान आहे. कारकिर्दीत अख्तरला अक्रमसोबत खेळण्याची संधी मिळाली. त्याच अक्रमचा जीव घेतला असता, असं धक्कादायक विधान अख्तरनं केलं.

तबलिगी जमातविरोधात बोलणाऱ्या बबितावर ज्वाला भडकली; म्हणाली... 

एका स्थानिक टिव्हीवर मुलाखत देताना अख्तरनं 90च्या दशकातील एका सामन्याचा उल्लेख केला. त्यात अक्रमनं अशक्य वाटणारा सामना पाकिस्तानच्या बाजूनं झुकवला. या मुलाखतीदरम्यान 44 वर्षीय अख्तर म्हणाला की,''जर मला अक्रमनं मॅच फिक्स करायला सांगितली असती तर मी त्याचा जीव घेतला असता.'' अक्रमनं असे आपल्याला कधी सांगितले नाही, असंही अख्तरनं स्पष्ट केलं.

चाहत्याची लॉटरी; टेनिस सुंदरी 'डेट'वर जायला तयार झाली, पण एका विचित्र अटीवर

तो म्हणाला,'' 1990चे काही सामने मी पाहत होतो. अक्रमने काही अशक्य सामने फिरवले होते, ते पाहून मला आश्चर्य वाटले. पण, जर मी सांगू इच्छितो की, मला अक्रमने त्यावेळी मॅच फिक्स करायला सांगितले असते, तर त्याची मी हत्या केली असती. अक्रमनं मला तसं कधीच करायला सांगितले नाही. अक्रमसोबत मी 7-8 वर्ष खेळलो. अक्रमने सुरुवातीचे विकेट्स घेऊन तळाच्या फलंदाजांना गुंडाळण्याची जबाबदारी मला अनेकदा दिली.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला धक्का; 'Hotness' मध्ये 20 वर्षीय अभिनेत्रीनं टाकलं मागे

फुटबॉल विश्वाला धक्का; सामन्यासाठी सराव करताना 22 वर्षीय खेळाडूचा मृत्यु

10-11 वर्षांपूर्वीच दिलेला सल्ला, आता जगाला पटतंय महत्त्व; शोएब अख्तरचा दावा

भारतीय क्रिकेटपटूचे वडील करतायत रुग्णांची सेवा 

Video : DJ ब्राव्होनं तयार केलं महेंद्रसिंग धोनीवर खास गाण; पाहा झलक

टॅग्स :शोएब अख्तरवसीम अक्रम