'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'

नेमकं काय म्हणाला शोएब अख्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:55 IST2025-09-22T19:28:04+5:302025-09-22T19:55:18+5:30

whatsapp join usJoin us
Shoaib Akhtar Blasted On Umpire For Fakhar Zaman Out IND vs PAK Asia Cup | 'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'

'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक स्पर्धेत दुसऱ्यांदा पाकिस्तान संघाला पराभूत करुन आपलं नाणं खणखणीत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. सुपर फोरच्या पहिल्याच लढतीतील पराभवामुळे पाकिस्तानचा संघावर आता स्पर्धेतून बाद होण्याची टांगती तलवार लटकत आहे. या पराभवानंतर पाकनं पुन्हा रडारड सुरु केली आहे. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनं दुबईच्या मैदानातील सामन्यातील फखर झमानच्या विकेट्सचा दाखला देत थर्ड अंपायरवर गंभीर आरोप केला आहे. हे म्हणजे नाचता येईना, अंगण वाकडे असाच काहीसा प्रकार आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

वादग्रस्त ठरलेल्या निर्णयावर शोएब अख्तरची 'बोलंदाजी'

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने १८.५ षटकात ४ विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करणाऱ्या फखर झमानच्या विकेट वादग्रस्त ठरली. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर  तिसऱ्या पंचांनी संजू सॅमसन याने घेतलेला झेल योग्य असल्याचा निर्णय देत पाकिस्तानी बॅटरला आउट दिले. त्यावर बॅटरनं नाराजी व्यक्त मैदान सोडलं. या मुद्यावरून आता शोएब अख्तरनं आपलं मत मांडलं आहे.

अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

नेमकं काय म्हणाला शोएब अख्तर?

'बेनिफिट ऑफ डाउट' या शब्दप्रयोगासह शोएब अख्तरनं थर्ड अंपायरच्या निर्णय हा पाकिस्तानच्या विरोधातील होता, असा दावा केलाय. एका शोमध्ये शोएब अख्तर म्हणाला की, फखर आउट नव्हता.  'बेनिफिट ऑफ डाउट'चा त्याला फायदा मिळायला हवा होता. २६ कॅमेरे लागले असताना थर्ड अंपायरनं फक्त दोन अँगल पाहून निर्णय दिला. यातील फ्रँट अँगलमध्ये चेंडू जमिनीला स्पर्श झाल्याचे दिसत होते. कॅच झालाच नव्हता. जर फखर झमान खेळला असता तर  कदाचित मॅच जिंकण्याचा डाव साधता आला असता, असे म्हणत अख्तरनं अंपायरचा निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. 

'बेनिफिट ऑफ डाउट' म्हणजे काय?

क्रिकेटच्या मैदानात अंपायरच्या एखाद्या वादग्रस्त निर्णयानंतर बऱ्याचदा तुम्ही Benefit of Doubt हा शब्द ऐकला असेल. खरंतर क्रिकेट नियमावलीत याचा थेट उल्लेख नाही. पण पायचित किंवा झेलबाद संदर्भातील निर्णय देताना जर ठोस पुरावा मिळत नसेल तर संशयास्पद परिस्थितीत पंच फलंदाजाच्या बाजूनं निर्णय देत त्याला नॉट आउट ठरवू शकतो. अख्तरनं या गोष्टीवर जोर देत फखर झमानला त्याचा फायदा मिळाला नाही, असे म्हटले आहे.

Web Title: Shoaib Akhtar Blasted On Umpire For Fakhar Zaman Out IND vs PAK Asia Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.