Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिखर धवन पुन्हा बोहल्यावर चढणार! 'संगीत नाईट'मध्ये गर्लफ्रेंड सोफी शाइनसोबत दिली रोमँटिक पोज

Shikhar Dhawan Sophie Shine Marriage: शिखर धवन आणि सोफी शाइन २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी एकत्र दिसले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 20:07 IST

Open in App

Shikhar Dhawan Sophie Shine Marriage: टीम इंडियाचा 'गब्बर' म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो त्याची आयरिश गर्लफ्रेंड सोफी शाइन हिच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे. हे त्याचे दुसरे लग्न असणार आहे. शिखर धवनने आपली होणारी पत्नी सोफी शाइन हिच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. आपल्या इंस्टाग्रामवर त्याने खास क्षण पोस्ट करत त्याची रोमँटिक स्टाईल दाखवून दिली आहे. तसेच, त्यात त्याने संगीत असेही लिहिले आहे, त्यामुळे त्याचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

शिखर धवनचे दुसरे लग्न

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये शिखर धवन ऑफ-व्हाइट इंडियन ड्रेसमध्ये दिसत आहे. तर सोफीने सोनेरी चमकदार लेहेंगा घातला आहे. हे जोडपे एकमेकांच्या नजरेत हरवलेले दिसत आहे. शिखर त्याच्या भावी जोडीदाराचा हात धरून रोमँटिक स्टाईलमध्ये निवांत वेळ घालवताना आणि पोज करताना दिसतोय. या जोडप्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आणि स्मितहास्य दिसून येत आहे. शिखरने त्याची 'लेडी लव्ह' असलेल्या सोफी शाइनसोबतचा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, आजची रात्र ही संगीत नाईट आहे. माझ्यासोबतची तरुणी ही आता जवळजवळ धवन कुटुंबात आलीच आहे. या कॅप्शनमुळे चाहते असाच अंदाज लावत आहेत की, शिखर धवन पुन्हा लग्न करत आहे. त्याचे हे कॅप्शन त्याच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाचे संकेत देत आहेत. परंतु त्याने अधिकृतपणे त्याच्या लग्नाची घोषणा केलेली नाही.

सोफी शाइन कोण आहे?

सोफी शाइन ही एक आयर्लंडची मॉडेल आहे. शिखर आणि सोफीचे नाते २०२५ मध्ये दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान सार्वजनिक जीवनात दिसून आले. त्यांना स्टँडमध्ये एकत्र पाहिले गेले आणि त्यानंतर मे २०२५ मध्ये इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून त्यांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केली. ते काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर सोफीपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे, परंतु वय ​​कधीही त्यांच्यात अडथळा ठरले नाही. शिखरने अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे तो लवकरच दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असल्याचा चाहत्यांचा अंदाज आहे.

शिखरची पहिली बायको कोण?

शिखरचे पहिले लग्न २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या आयशा मुखर्जीशी झाले होते आणि त्यांना झोरावर नावाचा मुलगाही आहे. पण कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांनी २०२३ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर झोरावर त्याची आई आयशा मुखर्जी सोबत राहतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Shikhar Dhawan to Marry Again? Romantic Pose with Sophie Shine

Web Summary : Indian cricketer Shikhar Dhawan is rumored to marry Sophie Shine. Photos of the couple at a 'Sangeet Night' spark speculation about his second marriage. Dhawan's caption hints at a new chapter in his life.
टॅग्स :शिखर धवनदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टऑफ द फिल्डलग्न