भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असतो. आएशा मुखर्जी हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर क्रिकेटच्या आयुष्यात सोफी शाइन नावाच्या सुंदरीची एन्ट्री झाली आहे. आपल्या गर्लफ्रेंडसोबत तो खास अन् रोमँटिक फोटो शेअर करतानाही दिसून येते. प्रेमाची एक नवी इनिंग सुरु असताना शिखर धवन याने आपल्या आयुष्यातील जुन्या गर्लफ्रेंडच्या आठणींना उजाळा दिलाय. रोहित शर्मासोबत रूम शेअर करताना चोरून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचो, असा मोठा खुलासा गब्बरनं केला आहे. यावेळी रोहित शर्मा काय तक्रार होती, तेही त्याने सांगून टाकलंय. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रेमाचा लपंडाव; टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये गर्लफ्रेंडला घेऊन जायचा, रोहित शर्मानं कली होती तक्रार
स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार शिखर धवन याने आपल्या आत्मचरित्रात भारत 'अ' संघाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील गर्लफ्रेंडवाला किस्सा शेअर केला आहे. गर्लफ्रेंडसंदर्भात धवनने आपल्या पुस्तकात लिहिलंय की, ती खूप सुंदर होती. अचानक मी पुन्हा प्रेमात पडलो. ही माझ्यासाठी बनली आहे. हिच्यासोबतच लग्न करायचं, असंही मी ठरवलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सराव सामन्यात अर्धशतकासह सुरुवात केली. सामना संपला की, मी एलेनला भेटायचो. मी तिला चोरून हॉटेलच्या रुममध्येही आणायलाही सुरुवात केली. त्यावेळी मी रोहित शर्मासोबत रुम शेअर करायचो. कधी कधी रोहित शर्मा "तू मला झोपू देणार आहेस का? अशी तक्रारही करायचा, असा किस्सा धवनने शेअर केला आहे.
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
गर्लफ्रेंडसोबत हातात हात घालून फिरताना निवडकर्त्यानेही पकडलं, पण...
मी गर्लफ्रेंडला रुममध्ये आणतोय ही गोष्ट संघातील सर्वांपर्यत अगदी वाऱ्यासारखी पसरली. एका रात्री मी एलेनचा एका रात्री मी एलनसोबत हातात हात घालून लॉबीमध्ये फिरत होता. त्यावेळी संघासोबत असलेल्या एका वरिष्ठ निवडकर्त्याने आम्हाला पाहिले. पण मी काही तिचा हात सोडला नव्हता. मी काही चुकीच वागतोय, असं वाटत नव्हते, अशी भावना मनात होती, असा उल्लेखही त्याने ही स्टोरी शेअर करताना केला आहे. एवढेच नाही तर या दौऱ्यातून वरिष्ठ संघात एन्ट्री मारण्याची संधी होती. पण चांगली कामगिरी न झाल्यामुळे ती संधी हुकली, हे देखील धवनने सांगितले आहे.
Web Title: Shikhar Dhawan Reveals Smuggling Girlfriend Into Room Shared With Rohit Sharma Hitman Wasnt Happy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.