Shikhar Dhawan New Home Price: शिखर धवन गेल्या काही महिन्यांपासून त्याची गर्लफ्रेंड सोफी शाइन सोबत दिसतोय. ही जोडी सतत चर्चेत आहे. त्यांनी नुकतेच एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांचे नातेही अधिकृत केले. सोफीने धवनसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता आणि त्याला 'माय लव्ह' म्हटले होते. त्या पोस्टमुळेच सोफी ही धवनची नवीन प्रेयसी असल्याचे निश्चित झाले होते. नवीन प्रेयसी मिळाल्यानंतर आता धवनने एक नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धवनने गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर असलेल्या DLFच्या सुपर-लक्झरी गृहनिर्माण प्रकल्प 'द डहलियास'मध्ये एक अपार्टमेंट खरेदी केले आहे.
अपार्टमेंटची किंमत किती?
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये DLFने हरियाणातील गुरुग्राम येथील DLF फेज ५ येथे १७ एकरचा सुपर लक्झरी गृहनिर्माण प्रकल्प 'द डहलियास' सुरू केला होता. त्यात ४२० अपार्टमेंट आणि पेंटहाऊसचा समावेश आहे. रिअल इस्टेट डेटा अनालिटिक्स फर्म CRE मॅट्रिक्सनुसार, धवनने ४ फेब्रुवारी २०२५ रोजी हा करार केला. फर्मच्या अहवालानुसार, हे अपार्टमेंट ६,०४० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे आणि त्याची किंमत सुमारे ६५.६१ कोटी रुपये आहे. तर यावर ३.२८ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आले आहे. याचा अर्थ धवनला या अपार्टमेंटसाठी सुमारे ६९ कोटी रुपये मोजावे लागले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीला सर्वप्रथम एकत्र दिसले धवन-सोफी
२०२५ च्या सुरुवातीला दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान शिखर आणि सोफी एकत्र दिसले होते. त्यानंतर, ही जोडी अनेक वेळा एकत्र दिसली. धवन आणि सोफी एका लग्नात डान्स करतानाही दिसले. ते दोघे एका मीडिया कॉन्क्लेव्हमध्येही एकत्र उपस्थित राहिले होते. त्यानंतर मे २०२५ मध्ये दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिली. त्यातच या नात्याची माहिती मिळल्यानंतर आता नवीन घराची बातमीही समोर आली आहे.