Shikhar dhawan on sophia qureshi: भारतीय लष्करातील कर्नन सोफिया कुरेशी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अलीकडेच एका भाजपच्या मंत्र्यांना त्यांच्यावर अक्षेपार्ट टिप्पणी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन याने कर्नल सोफिया कुरेशी यांचे कौतुक करणारी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सर्व भारतीय मुस्लिमांनाही सलाम केला आहे.
शिखर धवनची पोस्ट...
शिखर धवन याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "भारताचा आत्मा त्याच्या एकतेत आहे. कर्नल सोफिया कुरेशी सारख्या वीरांना आणि देशासाठी शौर्याने लढणाऱ्या असंख्य भारतीय मुस्लिमांना सलाम. जय हिंद!"
युद्धविराम उल्लंघनानंतर धवनची पाकिस्तानवर टीका
शिखर धवनने यापूर्वीही पाकिस्तानवर बोचरी टीका केली आहेत. 10 मे रोजी भारत-पाकिस्तान युद्धविरामाच्या अवघ्या 3 तासांनी पाकिस्तानने त्याचे उल्लंघन केले होते. याबद्दल शिखरने पोस्ट केली होती की, "या देशाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे."
याशिवाय, 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानी ड्रोन पाडल्यानंतरदेखील शिखरने पोस्ट केली होती. त्यात त्याने म्हटले होते की, "आपल्या सीमांचे इतक्या मजबूतपणे रक्षण केल्याबद्दल आणि जम्मूवरील ड्रोन हल्ले रोखल्याबद्दल आपल्या शूर सैनिकांना सलाम. भारत खंबीरपणे उभा आहे. जय हिंद!"
ऑपरेशन सिंदूर नंतर कर्नल सोफिया कुरेशी चर्चेत
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 जणांची हत्या केली होती, त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. यानंतर 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैनिकांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईची माहिती देण्यासाठी दोन महिला अधिकारी मीडियासमोर आल्या होत्या. एक भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि दुसऱ्या कर्नल सोफिया कुरेशी.
Web Title: Shikhar Dhawan on Sophia Qureshi: Shikhar Dhawan's special post for Colonel Sophia Qureshi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.