Join us

हे कधीच सुधरणार नाहीत...! पाकिस्तानच्या लाजिरवाण्या फिल्डिंगवरून धवनने उडवली खिल्ली

पाकिस्तानी क्रिकेट संघ त्यांच्या खराब फिल्डिंगमुळे देखील चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 13:11 IST

Open in App

पाकिस्तानी क्रिकेट संघ त्यांच्या खराब फिल्डिंगमुळे देखील चर्चेत असतो. पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाचे अनेक दाखले सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक २०२३ च्या सराव सामन्यात देखील याचा प्रत्यय पाहायला मिळाला. खरं तर पाकिस्तानी संघाच्या लाजिरवाण्या क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून चाहते त्यांची खिल्ली उडवत आहेत. भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनने हा व्हिडीओ शेअर करत शेजाऱ्यांची फिरकी घेतली.

धवनने पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाची उडवली खिल्ली सध्या क्रिकेटपासून दूर असलेल्या शिखर धवनने पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणावरून टीका केली आहे. धवनने शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळते की, पाकिस्तानी संघाचे दोन क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, शेवटी दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहतात आणि चेंडू त्यांच्यामधून निघून जातो. व्हिडीओ शेअर करताना गब्बरने कॅप्शनमध्ये लिहिले, "पाकिस्तान आणि फिल्डिंग ही कधीही न संपणारी प्रेमकथा आहे." 

शेजाऱ्यांची जोरदार धुलाई सध्या क्रीडा विश्वात आयसीसी वन डे विश्वचषकाचे वारे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत ३५१ धावा कुटल्या. हारिस रौफने ९ षटकांत ९७ धावा दिल्या. तर, शाहीन शाह आफ्रिदीने ६ षटकांत २५ धावा दिल्या. मोहम्मद वसीमनेही आठ षटकांत केवळ एक बळी घेत ६३ धावा दिल्या.

ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने फलंदाजीत कहर केला. मॅक्सवेलने अवघ्या ७१ चेंडूंचा सामना करत ७७ धावांची शानदार खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान मॅक्सवेलने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचवेळी कॅमेरून ग्रीनने देखील ४० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपशिखर धवनपाकिस्तानआॅस्ट्रेलिया