भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार क्रिकेटर 'गब्बर', अर्थात शिखर धवनने आयुष्याच्या नव्या इनिंग सुरूवात केली आहे. धवनने आज (शनिवार, २१ फेब्रुवारी) आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत एका खासगी समारंभात लग्नगाठ बांधली. हे दोघे गेल्या एक वर्षापासून रिलेशनशीपमध्ये होते. भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
शिखर धवन आणि सोफी शाइन यांच्या लग्नाचे विधी गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. या दोघांनी स्वतः संगीत आणि हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. युजवेंद्र चहलने शनिवारी झालेल्या या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर करताना 'मेरे यार की शादी है' असे कॅप्शन दिले आहे.
शिखर धवन आणि सोफी गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान दुबईमध्ये एकत्र सामना बघताना दिसले होते. यानंतर, मे महिन्यात त्यांन त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत आणि एकमेकांसोबत वारंवार फोटो शेअर करतात. १२ जानेवारीला त्यांचा साखरपुडा पार पडला होता.
कोण आहे सोफी शाइन? -सोफी शाइन मूळची आयर्लंडची आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, तिने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर कॅसलरॉय कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करत तीने मार्केटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली. तिने अबू धाबी, यूएई येथील नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये सेकंड व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कामही केले आहे.
धवनचे पहिले लग्नशिखर धवनने २०१२ मध्ये आयशा मुखर्जीशी पहिले लग्न केले होते. मात्र, २०२० पासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि न्यायालयाने २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट मंजूर केला. आता धवनने सोफीसोबत आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे.
Web Summary : Cricketer Shikhar Dhawan has married Ireland's Sophie Shinn in a private ceremony. They were in a relationship for a year. Yuzvendra Chahal confirmed the news by sharing photos. Dhawan's first marriage was to Ayesha Mukherjee in 2012, ending in divorce in 2023.
Web Summary : क्रिकेटर शिखर धवन ने आयरलैंड की सोफी शिन से निजी समारोह में शादी कर ली। वे एक साल से रिलेशनशिप में थे। युजवेंद्र चहल ने तस्वीरें साझा कर इस खबर की पुष्टि की। धवन की पहली शादी 2012 में आयशा मुखर्जी से हुई थी, जिसका 2023 में तलाक हो गया।