Join us

Team India: कसोटी, टी-२० नंतर आता वनडेतूनही नारळ, टीम इंडियातील या खेळाडूचं करिअर संपुष्टात?

Shikhar Dhawan: चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दोन खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही खेळाडू काही दिवसांपूर्वीपर्यंत भारतीय संघाचं नेतृत्व करत होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 16:17 IST

Open in App

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. निवड समितीने या मालिकेसाठी संघ निवडताना काही कठोर असे निर्णय घेतले आहेत. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दोन खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही खेळाडू काही दिवसांपूर्वीपर्यंत भारतीय संघाचं नेतृत्व करत होते.

श्रीलंकेविरुद्ध ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. तसेच या संघातून शिखर धवन आणि रिषभ पंत यांना डच्चू देण्यात आला आहे. शिखर धवन आणि रिषभ पंत यांनी हल्लीच भारतीय संघाचं नेतृत्व केले होते. पंत सध्यातरी कसोटी संघामध्ये आहे, तसेच चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याच्याकडे चांगली कामगिरी करून मर्यादित षटकांच्या संघांमध्ये परतण्याची संधी आहे. मात्र कसोटी, टी-२० पाठोपाठ वनडे संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवला गेल्याने डावखुरा सलामीवीर शिखर धवन याची कारकीर्द जवळपास संपुषात आली आहे.

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज असलेल्या शिखर धवनला बदलत्या काळानुरूप खेळण्याच्या पद्धतीत बदल करता आला नाही. आता निवड समितीने त्याला एकापाठोपाठ एक करून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारच्या संघातून बाहेरची वाट दाखवली आहे. शिखर धवनने त्याचा शेवटचा कसोटी सामना २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.

कसोटीनंतर काही वर्षांनी शिखर धवनला टी-२० च्या संघातूनही बाहेरची वाट दाखवण्यात आली होती. तसेच त्याला एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला निवड समितीकडून देण्यात आला होता. आता बांगलादेशविरुद्ध खेळलेली एकदिवसीय मालिका शिखर धवनच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका ठरण्याची शक्यता आहे. इशान किशन आणि शुभमन गिलच्या रूपात भारतीय संघाला दोन युवा सलामीवीर भेटले आहेत. तसेच ईशान किशन और शुभमन गिल के तौर पर भारत को युवा ओपनर मिल चुके हैं. तर शिखप धवनचा स्ट्राईक रेट कमी असून, त्याचं वयही अधिक असल्याने तो सध्याच्या संघामध्ये फिट बसत नाही.   

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघशिखर धवन
Open in App