Join us  

मुंबई इंडियन्सच्या शिलेदारानं आयपीएलपाठोपाठ ७ दिवसांत जिंकले पाकिस्तान सुपर लीगचे जेतेपद!

पाकिस्तान सुपर लीगला ( Pakistan Super League 2020) मंगळवारी नवा विजेता मिळाला. लाहोर कलंदर्स विरुद्ध कराची किंग्स यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात Karachi Kingsने बाजी मारली.

By स्वदेश घाणेकर | Published: November 18, 2020 11:03 AM

Open in App

पाकिस्तान सुपर लीगला ( Pakistan Super League 2020) मंगळवारी नवा विजेता मिळाला. लाहोर कलंदर्स विरुद्ध कराची किंग्स यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात Karachi Kingsने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कलंदर्सला ७ बाद १३४ धावाच करता आल्या आणि किंग्सनं हे लक्ष्य १८.४ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करून पहिल्यांदा PSLचे जेतेपद नावावर केले. पण, या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले ते वेस्ट इंडिजच्या शेर्फाने रुथरफोर्ड यानं कारण ७ दिवसांपूर्वी त्यानं मुंबई इंडियन्सकडून इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2020) जेतेपद नावावर केलं होतं.  रुथरफोर्ड इंडियन प्रीमिअर लीगनंतर UAE येथून पाकिस्तानात दाखल झाला. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो कराची किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. पण, या लीगमध्ये मैदानावर फलंदाजीसाठी जेव्हा तो उतरला तेव्हा त्याच्या हातात मुंबई इंडियन्स संघाचे ग्लोज पाहायला मिळाले. क्वालिफायर १ सामन्यात कराची किंग्स आणि मुल्तान सुल्तान सामन्यात हा प्रसंग पाहायला मिळाला. पण, अंतिम सामन्यात त्यानं ही चूक सुधारली. रुथरफोर्ड मुंबई इंडियन्सकडून IPL 2020मध्ये एकही सामना खेळला नाही. मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या १३व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सला ५ विकेट्स राखून पराभूत करताना पाचव्यांदा जेतेपद पटकावले.  MIनं संधी न दिलेल्या रुथरफोर्डला कराची किंग्सने अंतिम ११मध्ये स्थान दिले. पण, मुंबई इंडियन्सचे ग्लोज घालून मैदानावर उतरल्यानं सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला. PSLच्या फायनल सामन्यात त्याला भोपळा फोडता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना कलंदर्सकडून तमिम इक्बाल ( ३५), फाखर जमान ( २७) या सलामीवीरानंतर अन्य फलंदाजांची गाडी घसरली. त्यामुळे त्यांना ७ बाद १३४ धावांवर समाधान मानावे लागले. कराची किंग्सनं बाबर आझमच्या नाबाद ६३ धावांच्या जोरावर पाच विकेट्स राखून जेतेपद पटकावं. बाबरनं ४९ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीनं नाबाद खेळी केली.

टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेटमुंबई इंडियन्सIPL 2020