Join us

आयसीसी टी-२० रॅंकिंगमध्ये शेफाली दुसऱ्या स्थानी

मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी यादीत शेफालीचे ७४४ गुण आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 02:45 IST

Open in App
ठळक मुद्दे मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी यादीत शेफालीचे ७४४ गुण आहेत

दुबई : भारताची युवा स्फोटक फलंदाज शेफाली वर्मा हिने आयसीसी महिला टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. उपकर्णधार स्मृती मानधना सातव्या तसेच जेमिमा रॉड्रिग्ज नवव्या स्थानावर आहे.

मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी यादीत शेफालीचे ७४४ गुण आहेत. अव्वल स्थानावर असलेली ऑस्ट्रेलियाची बेथ मूने हिचे ७४८ गुण असून अव्वल दहामध्ये असलेल्या मानधनाचे ६४३ आणि रॉड्रिग्जचे ५९३ गुण आहेत. न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग चौथ्या आणि एलिसा हिली पाचव्या स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये दीप्ती शर्मा सहाव्या, फिरकीपटू राधा यादव आठव्या आणि पुनम यादव नवव्या स्थानी आहेत. सोफी एकलेस्टन ७९९ गुणांसह अव्वल स्थानी आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ