शार्दुलच्या पायावर शस्त्रक्रिया; तीन महिने क्रिकेटला मुकणार

Shardul Thakur: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याच्या पायावर बुधवारी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. तो किमान तीन महिने क्रिकेटला मुकणार आहे. शार्दुलने शस्त्रक्रियेचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याने लिहिले की, ‘शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली!’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 06:20 IST2024-06-13T06:20:03+5:302024-06-13T06:20:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Shardul Thakur's leg surgery; Will miss cricket for three months | शार्दुलच्या पायावर शस्त्रक्रिया; तीन महिने क्रिकेटला मुकणार

शार्दुलच्या पायावर शस्त्रक्रिया; तीन महिने क्रिकेटला मुकणार

लंडन - भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याच्या पायावर बुधवारी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. तो किमान तीन महिने क्रिकेटला मुकणार आहे. शार्दुलने शस्त्रक्रियेचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याने लिहिले की, ‘शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली!’ 

शार्दुलच्या पायावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया झाली.  २०१९ मध्येही त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. यंदा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शार्दुलच्या पायाची दुखापत पुन्हा उमळली होती. त्यानंतरही त्याने मुंबईला ४२व्यांदा रणजी चषक पटकावून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. यंदा आयपीएलमध्ये ९ सामन्यात त्याने केवळ ५ बळी घेतले.

 

Web Title: Shardul Thakur's leg surgery; Will miss cricket for three months