Join us  

CSKची स्ट्रॅटेजी ठरली, सुरेश रैनाच्या जागी उतरवणार स्फोटक ओपनर; शेन वॉटसननं सांगितला गेम प्लान

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) मोठा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 5:22 PM

Open in App
ठळक मुद्देसुरैश रैना अन् हरभजन सिंगनं वैयक्तिक कारणास्तव घेतली माघारचेन्नई सुपर किंग्ससाठी हा मोठा धक्का असल्याचे व़ॉटसननं केलं मान्य, पण...चेन्नईच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये दिसणार बदल

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) मोठा धक्का बसला. संघाचा उपकर्णधार सुरेश रैनानं ( Suresh Raina) वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली. वैयक्तिक कारणास्तव आपण ही माघार घेतल्याचे रैनानं सांगितले आहे, परंतु अजूनही CSK आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) त्याच्या माघारीमागचं खरं कारण कळलेलं नाही. मायदेशात परतल्यानंतर रैनानं पुन्हा आयपीएलमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्याला परवानगी मिळणार की नाही, याबाबतचा निर्णय BCCI घेईल. मात्र, CSKनं रैनाची अनुपस्थिती जाणवणार नाही, यासाठी स्ट्रॅटेजी तयार केली आहे. 

CSKचा फलंदाज शेन वॉटसन (Shane Watson) यानं सुरेश रैनासारख्या ( Suresh Raina) फलंदाजाची उणीव भरून काढणे अवघड आहे, परंतु CSKकडे बरेच पर्याय आहेत. रैना हा CSKचा सर्वकालीन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे आणि त्यानं CSKच्या तीन जेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.''सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या अनुपस्थितीच्या समस्येचा सामना तर करावाच लागेल. पण, CSKच्या बाबतीत एक चांगली गोष्ट अशी की, अन्य संघाच्या तुलनेत आमच्याकडे बरेच पर्याय आहे. रैनाची उणीव भरून काढणे अवघड आहे. तुम्ही ते करूच शकत नाही. आयपीएलमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत,'' असे वॉटसननं सांगितले. 

View this post on Instagram

#StartTheWhistles #Yellove #WhistlePodu

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

''यूएईतील खेळपट्टीवर त्याची फटकेबाजी चांगली चालली असती. तो फिरकी गोलंदाजांना उत्तमरित्या खेळतो,''असेही वॉटसनने सांगितले. 

रैनाच्या जागी मिळणार या खेळाडूला संधी 

रैनाच्या अनुपस्थितीत स्फोटक फलंदाज मुरली विजय याला संधी मिळण्याची शक्यता, वॉटसननं बोलून दाखवली. मुरली विजय हा ट्वेंटी-20तील स्फोटक फलंदाज आहे. मागील दोन मोसमात मुरली CSKकडून केवळ तीनच सामने खेळला आहे आणि त्यात त्यानं 76 धावा केल्या आहेत. वॉटसन म्हणाला,''रैना हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे, यात शंकाच नाही, परंतु आमच्याकडे मुरली विजयसारखा स्फोटक फलंदाज आहे. मागील काही वर्षांत त्याला पुरेशी संधी मिळाली नाही, परंतु तो दमदार फलंदाज आहे. त्याला यंदा संधी मिळू शकते.''

हरभजन सिंगच्या जागी पीयूष चावलाला अंतिम 11मध्ये संधी मिळू शकते. चेन्नईनं त्याच्यासाठी 6.75 कोटी मोजले आहेत.  

सुरेश रैनाला खेळायचंय, पण त्याला परवानगी मिळणार का?'रैनानं माघार का घेतली, हे बीसीसीआयला जाणून घ्यावं लागेल. त्याच्या माघार घेण्यामागे कुटुंब किंवा वैयक्तिक कारण आहे का, ते पहावं लागेल. महेंद्रसिंग धोनीसोबतचा वाद किंवा CSK मधील अंतर्गत वाद त्याच्या या निर्णयाचं कारण आहे का, तेही पहावं लागेल. नैराश्यामुळे त्यानं माघार घेतली असेल, तर ती त्याची मानसिक समस्या आहे. जर तो नैराश्यातच असेल, तर त्याला आम्ही परवानगी देणार नाही. तिथे काही चुकीचं घडलं तर त्याची जबाबदारी घेणार कोण?,''असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सुरेश रैनाची हकालपट्टीCSK संघाचे मालक एन श्रीनिवासन यांनीही रैनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना त्याला खडेबोल सुनावले होते. अर्थात त्यांनी त्या विधानावरून नंतर माघार घेत, रैना CSK कुटुंबाचा सदस्य असल्याचे सांगितले. त्यात रैनानं आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पुनरागमनाची शक्यता नाकारली नाही. पण, मायदेशात परतलेल्या रैनाची CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून हकालवट्टी करण्यात आलेली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

IPL 2020 : लाईक्स, कमेंट्स अन् गप्पाटप्पा; पृथ्वी शॉ अभिनेत्रीला करतोय 'डेट'? 

सानिया मिर्झा अन् शोएब मलिक यांची सात महिन्यांनी झाली भेट; पाकिस्तानी क्रिकेटपटूनं पोस्ट केला Video 

IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या जेतेपदासाठी सज्ज; पण 'ही' कमकुवत बाजू करू शकते घात! 

भारतीय वायुसेनेत राफेल विमान दाखल; MS Dhoniने केलं अभिनंदन, सांगितलं फेव्हरिट विमानाचं नाव

टॅग्स :आयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्ससुरेश रैनाशेन वॉटसनहरभजन सिंगमुरली विजय