Shane Warnes 18 Year Old Bet Family Gets 460 Crore From Rajasthan Royals Sale : आयपीएलच्या १९ व्या हंगामाचा शुभारंभ होण्याआधी या लोकप्रिय स्पर्धेतील पहिल्या हंगामातील विजेता राजस्थान रॉयल्स आणि गत हंगामातील विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघांची यांची मेगा डील झाली. दोन्ही संघांना नवे मालक मिळाले असून RCB चा संघ १६ हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांनी विकला गेला. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या संघावरही १५ हजार कोटींपेक्षा अधिक बोली लागली. या मेगा डीलमध्ये राजस्थानचा माजी कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा दिवंगत दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे कुटुंब मालामाल झाले आहे. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजस्थान रॉयल्सची विक्रमी किंमत
IPL 2026 च्या हंगामाआधी राजस्थान रॉयल्स संघाला अमेरिकेतील एका कन्सोर्टियमने (गुंतवणूकदारांचा गट) १.६३ अब्ज डॉलर (सुमारे १५,२९०कोटी) या विक्रमी किमतीत खरेदी केले आहे. २००८ च्या पहिल्या वहिल्या हंगामात फक्त ६७ दशलक्ष डॉलर मध्ये विकत घेतलेला हा संघ आज जगातील सर्वात मौल्यवान क्रीडा फ्रँचायझींपैकी एक ठरला आहे. मात्र या डीलमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती शेन वॉर्न यांच्या दूरदृष्टीपूर्ण गुंतवणुकीची, जी त्यांनी लीगच्या पहिल्याच हंगामात केली होती.
IPL मध्ये बाकावर बसून माफक पैसे कमावणारा क्रिकेटर झाला RCB चा सह मालक अन्...
राजस्थान रॉयल्ससोबत शेन वॉर्नचा खास करार
आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर २००८ मध्ये शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सच्या संघाचा कर्णधार झाला. निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी RR च्या संघासोबत या दिग्गजाने खास करार केला होता. वर्षाला २-३ कोटीच्या घरात मिळणाऱ्या मानधनासह त्याने या संघाकडून खेळण्याच्या बदल्यात संघात ०.७५ टक्के इक्विटी (हिस्सेदारी) घेतली होती. वॉर्न असा करार करणारा एकमेव खेळाडू होता. चार हंगाम संघाची धुरा सांभाळली आणि त्यामुळे त्यांची एकूण हिस्सेदारी ३ टक्के पर्यंत वाढली. दिवंगत दिग्गजाने एका मुलाखतीत म्हटले होते की, “मला संघ माझ्या पद्धतीने चालवण्याची पूर्ण मोकळीक दिली होती; मी तिथे ‘वन-स्टॉप शॉप’ होतो." २०१९ मध्ये संघाची किंमत ४०० दशलक्ष डॉलर असताना वॉर्न याने ३ टक्के हिस्सेदारीचा उल्लेख करताना ही गुंतवणूक चांगली आहे, असे म्हटले होते.
ती एक हटके डील अन् शेन वॉर्नचं कुटुंब मालामाल!
१.६३ अब्ज डॉलरच्या नव्या मूल्यमापनानुसार, दिवंगत ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न यांच्या कुटुंबाकडे असलेल्या सुमारे ३ टक्के हिस्सेदारीची किंमत आता अंदाजे ४५० ते ४६० कोटींवर पोहोचली आहे. ही गुंतवणूक केवळ आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरली नाही, तर मैदानाबाहेरही वॉर्न यांच्या गुंतवणूकीतील व्यवहारासंदर्भातील दूरदृष्टीपणा दाखवून देणारे एक उत्तम उदाहरण आहे.
वॉर्नच्या कुटुंबियांबद्दल बोलायचं तर त्याला एकुलता एक मुलगा आहे. ज्याचं नाव जॅक्सन वॉर्न (Jackson Warne) असं आहे. तो अनेकदा राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) च्या ताफ्यातही दिसला आहे. याशिवाय त्यांची मोठी मुलगी ब्रूक वॉर्न (Brooke Warne) आणि धाकटी लेक सुम्मेर वॉर्न (Summer Warne) या दोघीही सोशल मीडियावर वडिलांसोबतच्या आठवणी सातत्याने शेअर करताना दिसतात.