Shane Warne Death : फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड! Ajinkya Rahane पासून ते Rohit Sharma, Virat Kohli पर्यंत... क्रिकेट विश्वातून वॉर्नला श्रद्धांजली

शेन वॉर्नचं वयाच्या ५२व्या वर्षी झालं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:44 PM2022-03-04T20:44:36+5:302022-03-04T20:48:03+5:30

whatsapp join usJoin us
Shane Warne Death Ajinkya Rahane Rohit Sharma Shahid Afridi lead Cricket Fraternity to pay homage to Legend Spinner of Australia see reaction tweets | Shane Warne Death : फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड! Ajinkya Rahane पासून ते Rohit Sharma, Virat Kohli पर्यंत... क्रिकेट विश्वातून वॉर्नला श्रद्धांजली

Shane Warne Death : फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड! Ajinkya Rahane पासून ते Rohit Sharma, Virat Kohli पर्यंत... क्रिकेट विश्वातून वॉर्नला श्रद्धांजली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचं वयाच्या ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो थायलंडमध्ये होता. त्यावेळी त्याच्या विलामध्ये ही घटना घडली. त्याच्या वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला कृत्रिम पद्धतीने पुनरूज्जीवित करण्याचा प्रयत्न केला पण शेन वॉर्नने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याचे मृत घोषित करण्यात आल्याचं त्याच्या मीडिया टीमने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. शेन वॉर्नच्या अकाली निधनामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणे, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि इतर अनेक क्रिकेटपटूंनी शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली.

--

--

--

--

--

--

--

--

--

--

--

--

--

--

दरम्यान, शेन वॉर्नच्या बाबतीत घडलेली एक विचित्र गोष्ट म्हणजे त्याने १२ तासांपूर्वी एका माजी क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केलं आणि त्यानंतर सायंकाळी शेन वॉर्नचं दु:खद निधन झालं.  'रॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून दुःख झाले. तो एक महान खेळाडू होता आणि अनेक युवा खेळाडूंसाठी तो प्रेरणास्रोत होता. रॉड याला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्याने क्रिकेटमध्ये खूप योगदान दिलं. त्याच्या आत्म्यास शांती लाभो', हे शेन वॉर्नचं शेवटचं ट्वीट ठरलं.

Web Title: Shane Warne Death Ajinkya Rahane Rohit Sharma Shahid Afridi lead Cricket Fraternity to pay homage to Legend Spinner of Australia see reaction tweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.