Join us

नाइट क्लबमध्ये पॉर्न स्टारला बदडलं, शेन वॉर्नविरोधात पोलिसांत तक्रार

पोलिसांमध्ये तक्रार दाखल, 'महिलेवर हात उचलल्याचा अभिमान वाटतोय का, तुझी पातळी खूप खालची आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 18:36 IST

Open in App

लंडन, दि. 24 - ऑस्‍ट्रेलियाचा दिग्‍गज लेग स्पिनर शेन वॉर्न आपल्या खेळामुळे जेवढा चर्चेत राहिला तितकाच तो नवनव्या वादामध्ये अडकल्यामुळेही चर्चेत असतो. वॉर्न आता एका नव्या वादात अडकला आहे. लंडनमध्ये एका पॉर्न स्टारसोबत मारहाण करण्याचा आरोप शेन वॉर्नवर आहे. एका बारमध्ये पॉर्न स्टारच्या चेह-यावर मुक्का मारल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार,  सेंट्रल लंडनच्या एका प्रसिद्ध बारमध्ये वॉर्नने शनिवारी 31 वर्षांच्या वलेरी फॉक्सच्या चेह-यावर जोरदार मुक्का मारला. मुक्का मारल्यावर ती जमिनीवर कोसळली आणि त्यानंतर चेहरा लपवत ती बारच्या बाहेर निघून गेली. 

फॉक्सने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसंच या घटनेला  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म- ट्विटरद्वारा शेअर केलं आहे. याशिवाय 'महिलेवर हात उचलल्याचा अभिमान वाटतोय का, तुझी पातळी खूप खालची आहे' असं कॅप्शन टाकलं आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत असून सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचाही प्रय़त्न करत आहे. 

फॉक्सने आणखी एक ट्विट करून 'तू खूप प्रसीद्ध आहेस म्हणून तुला महिलांना मारण्याचा अधिकार मिळालेला नाही . मी खोटं बोलत नाहीये 'असं म्हटलं. तसंच तिने वेस्टमिन्स्टर पुलिस स्टेशनमध्ये पोहोचल्याचा एक फोटोही शेअर केला आहे. 

यापूर्वीही अडकलाय वादात -वर्ष 2000 मध्ये ब्रिटिश नर्स डोना राइटने वॉर्नवर अश्लील मेसेज पाठवण्याचा आरोप लावला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्टाने त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेतलं होतं. याशिवाय विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत त्याची पत्नी सिमोना त्याच्यापासून वेगळी झाली आहे.  

टॅग्स :क्रिकेटआॅस्ट्रेलिया