Join us
Daily Top 2Weekly Top 5

शमीचा अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा; बीसीसीआयची मध्यस्थी

शमीच्या पत्नी हसीन जहाँने त्याच्याविरुद्द गुन्हा दाखल केला होता व न्यायालयात हे प्रकरण असल्यामुळे व्हिसा मिळण्यात अडथळा निर्माण झाला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 15:37 IST

Open in App

मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अमेरीकेने व्हिसा देण्यास नकार दिला होता. मात्र  बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी हस्तक्षेप केल्यानंतर त्याला व्हिसा मिळाला. शमीच्या पत्नी हसीन जहाँने त्याच्याविरुद्द गुन्हा दाखल केला होता व न्यायालयात हे प्रकरण असल्यामुळे व्हिसा मिळण्यात अडथळा निर्माण झाला होता. 

भारतीय संघातील सर्व सदस्यांनी अर्ज केला होता, शमी वगळता सर्वांना एकाच वेळी व्हिसा मिळाला. शमीच्या बाबतीत बीसीसीआयने दूतावासात अतिरिक्त कागदपत्रे जमा केली, त्यानंतर त्यांना व्हिसा मिळाला. बीसीसीआयने खेळाडू व सहाय्यक कर्मचार्‍यांच्या व्हिसासाठी अर्ज मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासात दिला होता. शमीची टी -२० संघात निवड झाली नसली तरी त्याला अमेरिकेवरुनच वेस्टइंडिजमध्ये जावे लागेल.

भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री हे आधीपासूनच अमेरिकन व्हिसा धारक आहेत आणि ज्या खेळाडूंकडे अमेरिकेचा व्हिसा नाही, त्यांच्यासाठी बीसीसीआयने पी -१ व्हिसा प्रकारात अर्ज केला होता. शमी वगळता सर्वांना एकाच वेळी व्हिसा मिळाला होता. शमीच्या बाबतीत बीसीसीआयने दूतावासात अतिरिक्त कागदपत्रे जमा केली, त्यानंतर त्यांना व्हिसा मिळाला.

टीम इंडिया वेस्टइंडीज विरुद्धच्या वन डे आणि दोन कसोटी सामन्यात शमीची निवड झाली आहे. टीम इंडिया तीन टी -20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 

टॅग्स :भारतमोहम्मद शामीबीसीसीआय