Join us

"निर्लज्ज.. लाज नाही वाटत.."; सूर्यकुमार यादववर तुफान संतापले भारतीय क्रिकेटप्रेमी, काय घडलं?

Suryakumar Yadav IND vs PAK Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवची एक कृती चाहत्यांना प्रचंड खटकली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:25 IST

Open in App

Suryakumar Yadav Mohsin Naqvi IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कपला मंगळवारपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना आज होणार आहे. त्याआधी सर्व कर्णधारांची एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भारत आणि पाकिस्तानचे कर्णधार एकमेकांसमोर आले. चाहत्यांना उत्सुकता होती की, जेव्हा सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा समोरासमोर येतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी असेल. त्यानंतर एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आले की त्या दोघांनी स्टेजवरून खाली उतरल्यावर हस्तांदोलन केले. पण सध्या भारतीय चाहते सूर्यकुमार यादववर एका वेगळ्याच कारणासाठी चिडलेले आहेत. ते कारण म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, पाकिस्तानचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याशी केलेले हस्तांदोलन वादात सापडले आहे.

नेमका वाद काय?

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय मारले गेले. त्यानंतर या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आणि भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यावेळी सुरू झालेल्या भारत-पाक युद्धाच्या वेळी, पाकिस्तानचे मंत्री भारतावर अण्वस्त्रहल्ला करण्याच्या धमक्या देत होते. ते मंत्री म्हणजे मोहसीन नक्वी. त्यांनी अशा प्रकारची दर्पोक्ती करूनसुद्धा, सूर्यकुमार त्यांच्याशी हस्तांदोलन केले, याचा भारतीय क्रिकेटप्रेमींना प्रचंड राग आला आहे. याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले. 'सूर्यकुमार, तुला लाज वाटायला हवी', 'निर्लज्ज माणूस.. तुला लाज कशी वाटत नाही', अशा आशयाच्या कमेंट्सचा भडीमार झाला.

भारत-पाक कर्णधारांचेही झाले 'शेक हँड'

पत्रकार परिषदेनंतर सूर्यकुमार यादव स्टेजवर गप्पा मारत बसलेला होता. तर सलमान उठून स्टेजवरून खाली उतरला होता. या व्हिडीओवरून अनेकांनी निष्कर्ष काढला की सूर्या आणि सलमान यांनी हस्तांदोलन केले नाही. पण तसे नसून पुढे काही वेगळे घडले. सूर्यकुमार यादव स्टेजवरून खाली आला, तेव्हा सलमान अली आगा खालच्या बाजूला उभा होता. त्यावेळी सलमानने सूर्यापुढे हस्तांदोलनासाठी हात पुढे केला आणि सूर्यानेही हस्तांदोलन केले. त्यांच्यात संवाद झाला नाही, हे केवळ औपचारिक हस्तांदोलन होते.

टॅग्स :सूर्यकुमार यादवआशिया कप २०२५पाकिस्तानपहलगाम दहशतवादी हल्लाभारत विरुद्ध पाकिस्तान