Join us  

शकिबचे करीअर होऊ शकते खल्लास; यापूर्वीही केला होता 'हा' प्रताप

यापूर्वीही शकिबने बरेच प्रताप केले आहेत. त्यामुळे यापूर्वीही शकिबवर बंदी आणली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:53 PM

Open in App

मुंबई : बांगलादेशचा अष्टपैलू शकिब अल हसनवर आता दोन वर्षांनी बंदी लादण्यात आली आहे. पण यापूर्वीही शकिबने बरेच प्रताप केले आहेत. त्यामुळे यापूर्वीही शकिबवर बंदी आणली होती. त्यामुळे आता ही दोन वर्षांची बंदी आल्यावर शकिबचे करीअर खल्लास होऊ शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता भारत विरुद्ध बांगलादेश या मालिकेतही तो खेळू शकणार नाही.

शकिब हा सध्याच्या घडीला बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वामध्ये शकिबने एक गुणवान अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कमावले आहे. मैदानातही शकिब कामगिरी दमदार होत होती. आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तो अव्वल स्थानावर विराजमान होता. पण शकिबने यापूर्वीही काही प्रताप केल्याचे समजते. त्यामुळे यावेळी त्याचे करीअर धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

बांगलादेश क्रिकेट मंडळाने शकिबवर 2014 साली कारवाई केली होती. 2014 साली शकिब हा एका विदेशी ट्वेन्टी-20 लीगमध्ये खेळला होता. या लीगमध्ये खेळण्यापूर्वी शकिबने बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाची परवानगी घेतली नव्हती. त्याचबरोबर शकिबने त्यावेळी संघाचे प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांच्याबरोबरही वाद घातला होता आणि त्यांचा अनादर केला होता. त्यामुळे त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी बांगलादेश क्रिकेट मंडळाने घातली होती.

फिक्सिंगप्रकरणी बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शक्ब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. पण शकिबवर दोन वर्षांची बंदी असली तरी तो पुढच्या वर्षी क्रिकेच खेळू शकतो, असे म्हटले जात आहे. नेमके आयसीसीचे नियम आहेत तरी काय, आपण जाणून घेऊया...

सट्टेबाजाने शकिबशी संपर्क साधला होता. पण ही गोष्ट शकिबने आयसीसीला कळवली नाही. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी आयसीसीने घातली आहे. या दोन वर्षांच्या बंदीमध्ये दोन वेगवेगळ्या शिक्षा आहेत. या बंदीमुळे शकिब भारताच्या दौऱ्यावर येऊ शकणार नाही, ट्वेन्टी-20 विश्वचषकही खेळू शकणार नाही, पण तो पुढच्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात उतरू शकतो, असे म्हटले जात आहे.

आयसीसीने शकिबवर दोन वर्षांची बंदी लादली आहे. यामधील पहिल्या वर्षी त्याच्यावर पूर्ण बंदी लादण्यात आली आहे. या कालावधीमध्ये तो क्रिकेटशी निगडीत कोणतीही गोष्ट करू शकतो. तर दुसऱ्या वर्षासाठी त्याचे निलंबन करण्यात आले आहे. जर शकिबने पहिल्या वर्षभरात आयसीसीला पूर्णपणे सहकार्य केले. त्याने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचे पालन केले आणि नियमितपणे भ्रष्टाचारविरोधी अभ्यासिका आणि पुनर्वसन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला तर तो पुढच्या वर्षी म्हणजेच 29 ऑक्टोबर 2020 या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेश