Join us

Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा

अशी कामगिरी करणारा तो पहिला अन् एकमेव ऑलराउंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:25 IST

Open in App

Shakib Al Hasan World T 20 World Record : कॅरेबियन टी-२० लीगमध्ये बांगलादेशच्या ऑलराउंडरनं मोठा डाव साधला आहे. या स्पर्धेतील  सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स विरुद्धच्या सामन्यात अँटिगुआ अँण्ड बारबुडा फाल्कन्सच्या ताफ्यातून मैदानात उतरलेल्या शाकीब अल हसन याने ३ विकेट्स घेत टी-२० कारकिर्दीत ५०० विकेट्सचा पल्ला गाठला. या कामगिरीसह खास वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावे झाला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अशी कामगिरी करणारा तो पहिला अन् एकमेव ऑलराउंडर

 

कॅरेबियन लिग स्पर्धेत या पठ्ठ्यानं फक्त ११ धावा खर्च करत पाकिस्तानचा बॅटर मोहम्मद रिझवान, कायल मेयर्स आणि नवीन बिदेसी या तिघांची शिकार केली. टी-२० कारिकिर्दीत  ७००० धावा आणि ५०० विकेट्स घेणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. शाकिब अल हसन याने आपल्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत ५०२ विकेट्स घेतल्या आहेत. छोट्या फॉरमॅटमध्ये पाचशे विकेट्सचा डाव साधणारा तो बांगलादेशचा पहिला तर क्रिकेट जगतातील पाचवा गोलंदाज ठरलाय.

Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?

T20 क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारे गोलंदाज

  • राशीद खान (अफगाणिस्तान) - ६६० विकेट्स
  • ड्वेन ब्रावो (वेस्ट इंडिज) -६३१ विकेट्स
  • सुनील नरेन (वेस्ट इंडिज) -५९० विकेट्स
  • इमरान ताहिर (दक्षिण आफ्रिका) -५५४ विकेट्स
  • शाकिब अल हसन (बांगलादेश) - ५०२ विकेट्स

 

शाकिबची टी-२० तील कामगिरी

शाकिब अल हसन याने आपल्या टी-२० कारकिर्दीत ४५७ सामन्यात ७५७४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या खात्यात ३३ विकेट्स जमा आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात त्याच्या खात्यात २५५१ धावांसह १४९ विकेट्स आहेत. तो आयपीएलमध्येही खेळताना दिसला असून ७१ सामन्यात त्याने ७९३ धावांसह ६३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

बॉलिंगनंतर बॅटिंगमध्ये दाखवली धमक

सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियस संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १३३ धावा केल्या होत्या. पहिल्यांदा गोलंदाजीत छाप सोडताना ३ विकेट्स घेतल्यावर शाकिब अल हसन याने धावांचा पाठलाग करताना १८ चेंडूत २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २५ धावांची उपयुक्त खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

टॅग्स :टी-20 क्रिकेटबांगलादेशवेस्ट इंडिज