Join us  

आफ्रिदीनं पुन्हा तोडले तारे; गौतम गंभीरच्या आडून भारतावर बोचरी टीका

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात सुरू असलेले सोशल मीडियावरील युद्ध संपण्याचे नाव घेत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 12:18 PM

Open in App

मुंबई : गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात सुरू असलेले सोशल मीडियावरील युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आफ्रिदीने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रातून गंभीरला माज असल्याची टीका केली होती. त्यावर गंभीरने पाकिस्तानी क्रिकेटपटूचे मानसिक स्वास्थ्य ठिक नसल्याची टीका केली. त्यावर आफ्रिदीनं पुन्हा प्रत्युत्तर दिले, परंतु यावेळी त्याने गंभीरच्या आडून भारतावरही टीका केली. या प्रत्युत्तरावर नेटीझन्सने त्याला चांगलेच झोडपलं आहे.

गंभीरकडे व्यक्तिमत्त्व नाही. तो खूप अहंकारी आहे, अशी टीका आफ्रिदीने ‘गेम चेंजर’या आत्मचरित्रात केली आहे. त्याच्या टीकेला गंभीरने सडेतोड उत्तर दिले. ‘आफ्रिदी, तुझी टीका ही फार हास्यास्पद आहे. आम्ही (भारत) अजूनही पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा व्हिसा मंजूर करणे बंद केलेले नाही. (तू भारतात उपचारासाठी ये) मी स्वत: तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन,’ असे ट्विट केले.  शनिवारी आफ्रिदीच्या आत्मचरित्राचं प्रकाशन झाले. यावेळी त्याने गंभीरच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,''गंभीरची मानसिक स्थिती ठिक नाही आणि त्याला गरज असल्यास माझ्या हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार देतो. त्याला व्हिसाची काही समस्या आल्यास तिही मी सोडवेन.'' आफ्रिदी इतकंच बोलून थांबला नाही. ''भारत सरकार आमच्या देशातील नागरिकांना व्हिसा देत नाही, परंतु मी भारतातील प्रत्येकाचे माझ्या देशात स्वागत करतो. आमचे सरकार आणि लोकांनी नेहमीच भारतीयांचे स्वागत केले आहे. राहिला प्रश्न गौतमचा, तर त्याला उपचारासाठी मी व्हिसा मिळवून देतो,'' असे आफ्रिदी म्हणाला.

2007 सालच्या एसा सामन्यात गंभीरशी आफ्रिदीचा वाद झाला होता. या प्रकाराबाबत आत्मचरित्रात आफ्रिदीने खुलासा केला. तो म्हणतो, ‘काही जणांशी खासगी शत्रूत्व असते, तर काही जणांशी कामासंदर्भात. मात्र, गंभीरबद्दल माझे वैर वेगळे आहे. गंभीर विचित्र आहे.’

टॅग्स :शाहिद अफ्रिदीगौतम गंभीरभारतपाकिस्तान