Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद आफ्रिदीच्या 'ऑल टाईम एकादश' संघात एकाच भारतीय खेळाडूला स्थान

ष्टिरक्षक म्हणून आफ्रिदीनं रशीद लतिफची निवड केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:48 IST

Open in App

पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं बुधवारी ऑल टाईम एकादश संघ जाहीर केला. विशेष म्हणजे त्यानं या संघात केवळ एकाच भारतीय खेळाडूला स्थान दिले आहे. आफ्रिदीनं निवडलेल्या संघातील खेळाडूंची नावे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसेल. 

आफ्रिदीनं सलामीवीराची जबाबदारी सहकारी सईद अन्वरकडे दिली. अन्वरने पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करताना कसोटी आणि वन डेत 31 शतकांसह 13000 अधिक धावा केल्या आहेत. त्याच्यासाथीला आफ्रिदीनं ऑस्ट्रेलियन सलामीवीर अॅडम गिलख्रिस्टची निवड केली आहे. त्यानंत रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी निवड केली आहे.   

पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमान-उल-हकला संधी दिली आहे. उल-हकच्या नेतृत्वाखाली आफ्रिदीनं अनेक सामने खेळले आहेत. अष्टपैलू म्हणून जॅक कॅलिस याची निवड झाली आहे. यष्टिरक्षक म्हणून आफ्रिदीनं रशीद लतिफची निवड केली आहे. संघात गिलख्रिस्ट असतानाही आफ्रिदीनं यष्टिरक्षक म्हणून लतिफची निवड केल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आफ्रिदीचा संघ - सईद अन्वर, अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, सचिन तेंडुलकर, इंझमान-उल-हक, जॅक कॅलिस, रशीद लतिफ ( यष्टिरक्षक), वासीम अक्रम, शेन वॉटसन, ग्लेन मॅकग्राथ, शोएब अख्तर.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'त्या' एका निर्णयामुळे भारतीय खेळाडूवरील संकट टळलं!

15 वर्षीय खेळाडूनं विकल्या त्याच्याकडच्या 102 ट्रॉफी; जमा केलेला निधी केला दान

इंग्लंडच्या खेळाडूनं वर्ल्ड कप जर्सी लाखांत विकली; हॉस्पिटल्सना केली मदत 

क्वारंटाईनमुळे पाकिस्तानी खेळाडूची झाली अशी अवस्था; पाहा Video

क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का; Corona Virusनं घेतला दिग्गज खेळाडूचा जीव 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीसचिन तेंडुलकर