Join us

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीचा संताप, मुलीच्या लग्नानंतर तिचं बनावट अकाऊंट पाहिलं अन्...

शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा हिचा नुकताच वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीशी विवाह झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2023 17:34 IST

Open in App

Shahid Afridi: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाचे नुकतेच लग्न झाले. अंशा आफ्रिदीने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर अंशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते आणि एक फेक अकाउंट बनवले जात होते. यावर शाहिद आफ्रिदी चांगलाच संतापला.

शाहिद आफ्रिदीने सोमवारी एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि ज्यांनी बनावट खाती तयार केली त्यांना फटकारले. शाहिद आफ्रिदीने लिहिले की, मला सांगायचे आहे की माझ्या मुली सोशल मीडियावर नाहीत आणि जो कोणी त्यांच्या नावाने अकाऊंट चालवत आहे, ती बनावट आहेत. त्या अकाऊंटविरोधात तक्रार करायली हवी.

शाहीन शाह आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदीचे कराचीमध्ये ३ फेब्रुवारीला लग्न झाले होते. दोघांनीही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघाचे वर्तमान आणि माजी क्रिकेटपटूही दिसले. या लग्नाला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, सर्फराज अहमद आणि इतर खेळाडू उपस्थित होते. शाहीन आफ्रिदी आणि अंशा आफ्रिदी यांनी दोन वर्षांपूर्वी साखरपुडा केला होता. या दरम्यान शाहीन पाकिस्तान क्रिकेटचा नवा स्टार खेळाडू बनला आणि जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांमध्ये त्याची गणना होऊ लागली. लॉकडाऊन-कोरोना आणि वर्ल्ड कपमुळे त्यांचे लग्न काही काळ पुढे ढकलण्यात आले होते.

शाहीन आफ्रिदी सध्या पाकिस्तानचा स्टार आहे, तर शाहिद आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू आहे. शाहिदने आपल्या जावयाला १० क्रमांकाची जर्सी वापरण्याची विशेष परवानगीही दिली होती.

 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानलग्नट्विटर
Open in App