शाहिन शाह आफ्रिदीने ( Shaheen Shah Afridi) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात खतरनाक यॉर्कर टाकला. त्याचा हा भन्नाट यॉर्कर पाहून भारताविरुद्धच्या २३ ऑक्टोबरच्या लढतीसाठी स्वप्न रंगवू लागली आहेत. पण, आफ्रिदीच्या यॉर्करने अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमुनुल्लाह गुर्बाझला हॉस्पिटल गाठण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर त्याला चालताही येत नसल्याने सहकारी खेळाडूने त्याला पाठीवर उचलून मैदानाबाहेर नेल्याचे सर्वांनी पाहिले. प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना आफ्रिदीने पहिल्या दोन षटकांत माघारी पाठवले.
पहिल्या षटकातील पाचवा चेंडू आफ्रिदीने यॉर्कर टाकला आणि तो गुर्बाझच्या पायावर जाऊन जोरात आदळला. अम्पायरने लगेच हात वर करून गुर्बाझला LBW दिले. चेंडू एवढ्या जोरात लागला की गुर्बाझला चालायलाही जमत नव्हते. मैदानावर प्राथमिक उपचार घेतल्यानंतरही तो वेदनेने कळवळत होता. अखेरत त्याला राखीव खेळाडूने पाठीवर घेतले आणि मैदानाबाहेर नेले.
हाती आलेल्या वृत्तानुसार गुर्बाझला त्यानंतर नजिकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे आणि त्याच्या डाव्या पायाचा स्कॅन केला गेला आहे. गुर्बाझची दुखापत गंभीर नसावी अशी प्रार्थना अफगाणिस्तानचे खेळाडू करत असतील. शनिवारी इंग्लंडविरुद्ध सुपर १२ गटात अफगाणिस्ताचा सामना आहे.
दरम्यान आजच्या सामन्यात अफगाणिस्तानन ६ बाद १५३ धावा केल्या. इब्राहिम झाद्रानने ३५, तर मोहम्मद नबीने ३७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ५१ धावा केल्या. उस्मान घानीने २० चेंडूंत नाबाद ३२ धावा करून नबीसोबत अर्धशतकी भागीदारी केली. आफ्रिदीने दोन, हॅरिस रौफने दोन विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"cr