Join us  

Video : पाकिस्तानी गोलंदाजानं ट्वेंटी-20 केला कहर, सहा विकेट्स त्याही 'Bowled'; चार चेंडूंत टीपले चार गडी

हॅम्पशायर ( Hampshire ) संघाचे प्रतिधित्व करणाऱ्या गोलंदाजानं मिडलेसेक्स ( Middlesex) संघाविरुद्ध सहा विकेट्स घेतल्या आणि त्याही Bowled..

By स्वदेश घाणेकर | Published: September 21, 2020 4:08 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाचा आनंद लुटत असताना रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. KXIP आणि DC यांच्यातला सामना नाट्यमयच होता. दोन्ही संघांकडून कडवा संघर्ष पाहायला मिळाला, परंतु DCच्या मार्कस स्टॉयनिसनं ( Marcus Stoinis) आधी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत कमाल दाखवून DCला विजय मिळवून दिला. कागिसो रबाडानं ( Kagiso Rabada) टाकलेली सुपर ओव्हर ( Super Over) अफलातून होती. एकीकडे IPLचा आनंद लुटत असताना इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीनं ट्वेंटी-20 ब्लास्ट लीगमध्ये खतरनाक गोलंदाजी केली. 

हॅम्पशायर ( Hampshire ) संघाचे प्रतिधित्व करणाऱ्या आफ्रिदीनं मिडलेसेक्स ( Middlesex) संघाविरुद्ध सहा विकेट्स घेतल्या आणि त्याही Bowled.. विशेष म्हणजे त्यानं चार चेंडूंत प्रतिस्पर्धीचे चार फलंदाज माघारी पाठवले. पाकिस्तानकडून चार चेंडूंत चार विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. या कामगिरीच्या जोरावर त्यानं ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासाच्या पुस्तकात स्वतःचे नाव लिहिले. त्यानं एकहाती मिडलेसेक्स संघाच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. शाहिनने 19 धावांत 6 विकेट्स घेतल्या.  ( IPL 2020 Live Updates, Click here)  

 ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा KXIPला फटका; वीरू, इरफाननं काढले जाहीर वाभाडे!

142 धावांचा पाठलाग करताना मिडलेसेक्स संघासाठी जॉन सिम्पसन ( 48) वगळता अन्य खेळाडूंना अपयश आले. पण, शाहिननं 18 व्या षटकात पहिल्या दोन चेंडूंत प्रत्येकी एक धाव दिली आणि त्यानंतर चार चेंडूंत चार फलंदाजांचे त्रिफळे उडवले. 

पाहा व्हिडीओ...  

ट्वेंटी-20त चार चेंडूंत चार विकेट्स घेणारे गोलंदाज आंद्रे रसेल ( 2013) अल अमिन होसैन ( 2013)  रशीद खान ( 2019)लसिथ मलिंगा ( 2019)  अभिमन्यू मिथून ( 2019)  

अन्य म्हत्त्वाच्या बातम्या 

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार 

नशीब! मॅक्क्युलमला बॉलिंग करावी लागणार नाही; सांगतोय सर्वात महागडा बॉलर  

सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद

तीव्र वेदनेनं मैदान सोडणारा आर अश्विन पुढील सामन्यात खेळणार, पण...

टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेट