Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shafali Verma Record : 'लेडी सेहवाग'नं इतक्या षटकारांसह रचला विक्रम; असा पराक्रम करणारी ठरली पहिली

WPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या ५ बॅटरमध्ये ३ भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 21:40 IST

Open in App

Women Premier League 2026 DC vs RCB Shafali Verma Created History : लेडी सेहवाग या नावाने महिला क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी शेफाली वर्मा हिने WPL च्या इतिहासात नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्धच्या सामन्यात शेफाली वर्मा हिने अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. तिची ही खेळी ४ चौकार आणि ४ षटकारांसह बहरलेली होती. WPL च्या इतिहासातील सातव्या अर्धशतकासह तिने या स्पर्धेच्या इतिहासात षटकारांच्या अर्धशतकाचा खास विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दिल्लीच्या दंबग गर्लनं साजरे केले षटकारांचे अर्धशतक 

शेफाली वर्मा ही WPL मधील सिक्सर क्वीन आहे. RCB विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या लेडी दंबगनं या स्पर्धेत ५० षटकार मारण्याचा डाव साधला. असा पराक्रम करणारी ती पहिली बॅटर ठरली आहे. फक्त ३१ सामन्यात तिने हा मोठा डाव साधला आहे. नाणेफेक गमावल्यावर फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची सुरुवात खराब झाली. लॉरेन बेलने पहिल्याच षटकात दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. त्यापाठोपाठ दुसऱ्या षटकात सायली सतघरेने आपल्या संघाला दुसरे यश मिळवून दिले. अवघ्या १० धावांवर दोघी माघारी फिरल्यावर शेफाली वर्मानं संघाचा डाव सावरणारी खेळी साकारली. 

WPL 2026 : मुंबई इंडियन्समधील फॉरेनची ब्युटी! 'या' खास कारणामुळे ती आलीये चर्चेत

WPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या ५ बॅटरमध्ये ३ भारतीय

सायली सतघरेच्या चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शेफालीने WPL च्या इतिहासातील विक्रमी षटकार मारला. यंदाच्या हंगामातील तिच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार आहे.  शेफाली पाठोपाठ WPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या बॅटरच्या यादीत अ‍ॅश्ले गार्डनर आणि रिचा घोष यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू गार्डनरने २९ सामन्यांत ३२ षटकार मारले आहेत. ती गुजरात जायंट्स संघाकडून खेळते. RCB ची विकेटकीपर बॅटर रिचा घोष हिने २९ सामन्यांत ३२ षटकार  ठोकले आहेत. न्यूझीलंडची सोफी डिवाइन २२ सामन्यांत ३० षटकार तर मुंबई इंडियन्स (MI) ची कर्णधार हरमनप्रीत कौर ३२ सामन्यांतील ३० षटकारांसह या यादीत आघाडीच्या पाच खेळाडूंच्या यादीत आहे. 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगशेफाली वर्मादिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर