Join us

shocking... अधिकाऱ्याने केले महिलेचे लैंगिक शोषण; बीसीसीआय गुंडाळले होते प्रकरण

हे प्रकरण बीसीसीआयने गुंडाळले असले तरी ते बिहार क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 17:54 IST

Open in App
ठळक मुद्दे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कार्यालयातील एका महिला कर्मचारीचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

मुंबई : बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कार्यालयातील एका महिला कर्मचारीचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. हे प्रकरण बीसीसीआयने गुंडाळले असले तरी ते बिहार क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

 बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य कुमार यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी आरोपीचे नाव लिहिलेले नाही, पण त्यांनी असा एक अनुचित प्रकार घडला असल्याचे पत्रामध्ये लिहीले आहे. या पत्रामध्ये आदित्य यांनी राय यांच्यावरही टीका केली आहे.

आपल्या पत्रामध्ये आदित्य वर्मा म्हणाले की, " बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका महिला कर्मचारीचे लैगिंक शोषण केले आहे. हे तुम्हाला माहिती असूनही तुम्ही त्यावर काही कारवाई केली नाही. तुम्ही कायद्याचे उल्लंघन करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारच्या गोष्टींसाठी विशाखा गाइडलाईन्स दिल्या आहेत. या गोष्टींचा वापर करून आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी. "

टॅग्स :बीसीसीआयलैंगिक छळलैंगिक शोषण