Join us

कहानी घर घर की! दिनेश कार्तिक अन् दीपिका पल्लीकल यांच्यात तू तू मै मै, मजेशीर पोस्ट व्हायरल

भारतात क्रिकेटचं वेडं कितीय, हे वेगळं सांगायला नको... क्रिकेटपटूंच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उतावळे झालेले असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:48 IST

Open in App

भारतात क्रिकेटचं वेडं कितीय, हे वेगळं सांगायला नको... क्रिकेटपटूंच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उतावळे झालेले असतात. त्यामुळेच सोशल मीडियावर क्रिकेटपटूंपासून त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनाही चाहते फॉलो करत असतात... भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज  दिनेश कार्तिक आणि दिग्गज स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल हा पती-पत्नीमध्ये झालेली तू तू मै मै जगासमोर आली आहे. नुकतंच दिनेशने एक ट्विट करून आपल्या वैवाहिक आयुष्यातील एक प्रसंग सर्वांसोबत शेअर केला आहे.

दिनेश कार्तिकसोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतो. तो नेहमी त्याच्या जीवनातील अनेक अपडेट्स तसेच विविध विषयांवर आपले मत मांडत असतो.  त्याने एक ट्विट केले आणि त्यात पत्नीसोबत घडलेला प्रसंग वेळेसह मांडला... त्याने लिहिले,''पहाटे ४.२५ वाजता - मी उठलो आणि परत झोपी गेलो. दीपिका काहीतरी बडबडली. मी अर्ध्या झोपेत होतो आणि म्हणालो - ठीक आहे. दीपिका म्हणाली - मी काहीही विचारले तर तू उत्तर देत नाहीस. सकाळी ७ वाजता मी म्हणालो - कॉफी प्लीज. दीपिकाचे उत्तर -  जा आणि स्वतः बनव.''

दिनेशने आपल्या वैवाहिक आयुष्यातील हा प्रसंग सांगून ट्विटमध्ये म्हटले, मला माहित होते की हे होणार आहे. माझ्यासारखाच अनुभव इतर कोणाला आला आहे का? कार्तिकच्या पोस्टला चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. कार्तिकने २६ कसोटींत १ शतक व ७ अर्धशतकांसह १०२५ धावा केल्या आहेत. ९४ वन डे व ६० ट्वेंटी-२० सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे १७५२ व ६८६ धावा आहेत. 

टॅग्स :दिनेश कार्तिकसोशल मीडिया
Open in App