Join us

IND vs AUS : उपकर्णधार जाहीर करण्याआधी बीसीसीआयने वाट बघायला हवी होती - दीप दासगुप्ता

दासगुप्ता याने बीसीसीआयच्या राहुलला उपकर्णधारपद देण्याच्या निर्णयावरही टिका केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 23:36 IST

Open in App

ऑस्ट्रेलियाला जाणारा भारतीय संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यात रोहित शर्मा नसल्याने आणखीच वाद उफाळला आहे. अनेक दिग्गजांनी रोहितचा संघात समावेश नसल्याने टिका केली आहे. बीसीसीआयने उपकर्णधाराची जागा के.एल. राहूल याला दिल्याने माजी यष्टीरक्षक फलंदाज दीप दासगुप्ता चांगलाच नाराज झाला आहे. दासगुप्ता याने आपली नाराजी प्रकट केली. तो म्हणाला की, बीसीसीआयने किमान एक अठवडा तरी राहुल याला उपकर्णधार म्हणून नेमण्याआधी विचार करायला हवा होता.

ऑस्ट्रेलिया विरोधातील ही मालिका ३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या संघात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला स्थान मिळालेले नाही. रोहित शर्माला या आयपीएल दरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापतीचा सामना करावा लागत आहे. त्याला संघातून वगळल्याचा निर्णय त्याचे चाहते आणि क्रिकेट दिग्गजांना देखील पचलेला नाही.  दीप दासगुप्ता याने देखील नाराजी व्यक्त केली आहे. तो एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, रोहित हा काही सामन्यांना मुकला आहे. पण मला वाटते की तो काही सामन्यात नक्कीच खेळु शकेल.  आणि मग राष्ट्रीय संघातून देखील त्याला स्थान मिळू शकते. त्याची शक्यता आहे. असे असले तरी त्याने नेट्समध्ये सरावा सुरूवात केली आहे.

दासगुप्ता याने बीसीसीआयच्या राहुलला उपकर्णधारपद देण्याच्या निर्णयावरही टिका केली आहे.  दुखापतग्रस्त असूनही मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र रोहित दूर आहे. त्यावरही दीप दासगुप्ताने निशाणा साधला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघ