Join us

सेहवाग-गंभीर जोडी पुन्हा पाहायला मिळणार

वीरु आणि गौती या जोडीने आतापर्यंत भारताला बऱ्याचदा चांगली सलामी करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 20:40 IST

Open in App

नवी दिल्ली : वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी एक काळ चांगलाच गाजवला. वीरु आणि गौती या जोडीने आतापर्यंत भारताला बऱ्याचदा चांगली सलामी करून दिली. आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे, पण ती क्रिकेटच्या मैदानात नाही तर दिल्ली क्रिकेट असोसिशेनमध्ये.

दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष रजत शर्मा यांनी क्रिकेट समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये सेहवागला स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर गंभीरलाही या समितीमध्ये विशेष निमंत्रिक हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली संघटनेच्या क्रिकेट समितीमध्ये वीरु आणि गौती ही जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना दिसणार आहे.

दिल्लीच्या असोसिएशनने क्रिकेट समितीमध्ये तीन सदस्यांची निवड केली आहे. या समितीमध्ये सेहवागसह राहुल संघवी आणि आकाश चोप्रा या भारताच्या दोन क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर विशेष निमंत्रित म्हणून गंभीरची निवड केली आहे.

टॅग्स :विरेंद्र सेहवागगौतम गंभीरक्रिकेट