Join us

सेहवाग बनला साधू, ट्विटरवरचा फोटो झाला वायरल

सेहवागने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहे. त्याचे चाहते याला खूप पसंतही करीत आहेत. काहींना तर आश्चर्य वाटत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 20:02 IST

Open in App
ठळक मुद्देइन्स्टाग्रामवरील या फोटो ४.५० लाख लाइक्स तर ट्विटरवर ६१ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

सचिन कोरडे : भारतीयक्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या छायाचित्रात सेहवाग हा चक्क साधूच्या वेशात दिसतोय. सेहवागने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहे. त्याचे चाहते याला खूप पसंतही करीत आहेत. काहींना तर आश्चर्य वाटत आहे.

 ही पोस्ट टाकताना सेहवागने म्हटले की, ‘गुरू करना जान कर, पानी पीना छान कर। जय भोले, जय श्रीराम, जय बजरंगबली।’ तर इन्स्टाग्रामवर त्याने लिहिले आहे की, ‘अर्जी हमारी, मर्जी आपकी, मेरा आशीर्वाद सदा है टीम इंडिया के साथ... जय भोले।’ सेहवागच्या या छायाचित्रांवर चाहत्यांच्या कमेंट्स भरपूर पडल्या. इन्स्टाग्रामवरील या फोटो ४.५० लाख लाइक्स तर ट्विटरवर ६१ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. सेहवाग ज्या प्रकारे आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता तसाच तो आता सोशल मीडियावर आपले मत मांडताना दिसतोय. 

टॅग्स :विरेंद्र सेहवागक्रिकेटभारत