Team India lands in Perth for T20 World Cup 2022 - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ शुक्रवारी पर्थमध्ये दाखल झाला आहे. २३ ऑक्टोबरला पाकिस्तानचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघ पर्थमध्ये सराव करणार आहे आणि येथे दोन सराव सामनेही खेळणार आहे. भारताचा १४ सदस्यीय संघ आणि सपोर्ट स्टाफ सदस्य गुरूवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. BCCI ने भारतीय संघाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. कर्णधार रोहित शर्माने त्याच्या इस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून पर्थला पोहोचल्याचे अपडेट्स दिले.
भारतीय खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, तेथील फोटो रोहितने त्याच्या इस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. पर्थ शहरातील या हॉटेलच्या खिडकीतून सुंदर नजारा दिसतोय... युवा गोलंदाज अर्शदीप सिंग यालाही हॉटेलच्या खिडकीतून दिसणाऱ्या नजाऱ्याचा फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यानेही इस्टा स्टोरीवर फोटो पोस्ट केला.
![]()
![]()
वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील या शहरात भारतीय संघाचा पहिला सराव सत्राचा बेस कॅम्प असणार आहे. ८ ऑक्टोबरला पहिले सराव सत्र होईल. त्यानंतर १० व १३ ऑक्टोबरला भारतीय संघ स्थानिक संघ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश विरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहेत. बिग बॅश लीगमधील पर्थ स्कॉचर्स या संघांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हे अपडेट्स दिले आहेत. भारतीय खेळाडूंसाठी त्यांनी खास भारतीय पदार्थही तयार केले आहेत.
भारतीय संघ-
रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग. राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
सराव सामन्यांचं वेळापत्रक ( Warm-up matches of the Indian team)
- भारत वि. स्थानिक क्लब, १० ऑक्टोबर
- भारत वि. स्थानिक क्लब, १२ ऑक्टोबर
- भारत वि. ऑस्ट्रेलिया, १७ ऑक्टोबर
- भारत वि. न्यूझीलंड, १९ ऑक्टोबर
मुख्य स्पर्धेतील वेळापत्रक
- २३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
- २७ ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, दुपारी १२.३० वाजल्यापासून, सिडनी
- ३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून, पर्थ
- २ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, दुपारी १.३० वाजल्यापासून, एडलेड
- ६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
- १३ नोव्हेंबरला अंतिम सामना
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स, डिस्नी हॉटस्टार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"