नॉर्थम्पटन : एमिलियो गे (७१ धावा, ११७ चेंडू) आणि सलामीवीर टॉम हैन्स यांच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंड लायन्सने भारतीय अ संघाच्या ३४८ धावांना उत्तर देताना चार दिवसांच्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पावसामुळे दिवसाचा खेळ थांबवावा लागला तोपर्यंत ४६ षटकांत ३ बाद १९२ अशी मजल गाठली.
यजमान संघ भारत अ च्या तुलनेत अद्याप १५६ धावांनी मागे असून त्यांचे ७ फलंदाज शिल्लक आहेत. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी जॉर्डन कॉक्स ३१ धावांवर नाबाद होता. भारत अ कडून अंशुल कंबोज, तुषार देशपांडे आणि तनुष कोटियान या युवा गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधीही पावसामुळे चहापानासाठी खेळ थांबविण्यात आला तेव्हा यजमान संघाच्या २ बाद १४६ धावा होत्या. अंशुल कंबोजने बेन मॅकिनी (१२) याला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडे झेल देण्यास भाग पाडले.
लोकेश राहुलचे शतक आणि ध्रुव जुरेलच्या अर्धशतकानंतर तळाच्या फळीतील फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरल्यामुळे भारत अ संघाचा पहिला डाव ३४८ धावांत संपुष्टात आला. भारत अ संघाने शुक्रवारच्या ८७ षटकांतील ७ बाद ३१९ वरून आज पुढे सुरुवात केली. २९ धावांची भर घालून तीन फलंदाज बाद झाले.
तनुष कोटियान याने ३७ चेंडूत १५ आणि कंबोज २ धावा काढून परतला. जोशुआ टंग याने दोघांचा बळी घेतला. तुषार देशपांडे (११) धावबाद झाला. खलील अहमद ७ धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक
भारत अ पहिला डाव : ८९.३ षटकांत सर्वबाद ३४८ (लोकेश राहुल ११६, ध्रुव जुरेल ५२, करुण नायर ४०, नितीश रेड्डी ३४) गोलंदाजी : ख्रिस व्होक्स ३/६०, जोश टंग २/९१, जॉर्ज हिल २/५६. इंग्लंड लायन्स पहिला डाव : ४६ षटकांत ३ बाद १९२ (टॉम हैन्स ५४, एमिलियो गे ७१, जॉर्डन कॉक्स खेळत आहे ३१), गोलंदाजी : अंशुल कंबोज १/३८, तुषार देशपांडे १/४४, तनुष कोटियान १/२१.
Web Title: Second unofficial Test: Bottom batsmen fail, India A 348, England Lions 192 for 3
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.