Join us  

दुसरी टी२० लढत आज : मालिका बरोबरीसाठी भारताची धडपड

दुसरी टी२० लढत आज : बांगलादेश मात्र दुसरा धक्का देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 5:53 AM

Open in App

राजकोट : वेगवान क्रिकेटमध्ये दडपणात आलेला भारतीय संघ पाहुण्या बांगलादेशविरुद्ध गुरुवारी येथे होणाऱ्या दुसºया टी२० सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी धडपडत आहे. त्याचवेळी, या सामन्यावर चक्रीवादळाचे सावट घोंघावत आहे.

दिल्लीतील प्रदुषणावर मात करीत बांगलादेशने भारताला ७ गड्यांनी नमविले होते. दुसरीकडे गेल्या काही वर्षांत भारताला एकदिवसीय व कसोटी सामन्याच्या तुलनेत टी२० अपेक्षित यश मिळू शकले नाही. यंदा आॅस्ट्रेलियाविरुद्ध घरच्याच मैदानावर भारतीय संघ पराभूत झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका बरोबरीत सुटली. कसोटीत मात्र भारताने आफ्रिकेला ‘व्हाइट वॉश’ दिला. नियमित कर्णधार विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना या मालिकेत दमदार कामगिरी करण्याची संधी आहे.आॅस्ट्रेलियात होणाºया टी२० विश्वचषकासाठी संघबांधणी करायची असल्याने, सलामीवीर शिखर धवन याचा फॉर्म व धावगती याविषयी संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. कर्णधार रोहित शर्माही पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरला होता. स्थान टिकविण्यासाठी सरसावलेला लोकेश राहुल व श्रेयस अय्यरसह युवा खेळाडूंवर विशेष जबाबदारी असेल. रिषभ पंत, कृणाल पांड्या व शिवम दुबे यांना प्रतिकुल परिस्थितीत योगदान द्यावे लागेल. अनुभवहीन गोलंदाजीदेखील चिंतेचा विषय आहे. दिल्लीत अपयशी ठरलेल्या खलील अहमदऐवजी शार्दुल ठाकूरला राजकोट येथे संधी मिळू शकते.दुसरीकडे मुशफिकूर रहिमच्या फलंदाजीच्या बळावर विजय मिळविणारा बांगलादेश गोलंदाजीतही प्रभावी ठरला होता. दुसºया लढतीत हीच लय कायम राखण्याच्या निर्धारासह संघ उतरेल, यात शंका नाही. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धीसंघ :भारत : रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, युझवेंद्र चहल, दीपक चाहर, राहुल चाहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पांड्या, रिषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर.बांगलादेश : महमुदुल्लाह रियाद (कर्णधार), ताईजुल इस्लाम, मोहम्मद मिथून, लिटन दास, सौम्या सरकार, नईम शेख, मुशफिकुर रहीम, आफिफ हुसेन, मोसादेक हुसेन सेकत, अमीनुल इस्लाम बिप्लब, अराफात सनी, अबू हिदेर, अल अमीन हुसेन, मुस्तफिजूर रहमान आणि शफी उल इस्लाम.टी२० क्रिकेट नवोदित खेळाडूंची चाचणी घेण्यासाठी - रोहित‘टी२० क्रिकेटमध्ये उदयोन्मुख खेळाडूंची चाचणी घेता येते आणित्यानंतर ते एकदिवसीय व कसोटी खेळू शकतात,’ असे मत भारतीय कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.रोहित म्हणाला, ‘आम्ही टी२० मध्ये अनेक खेळाडूंची चाचणी घेत आहोत. एकदिवसीय व कसोटीमध्ये आमचा मुख्य संघ खेळत आहे. त्यामुळे यात उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळते. या प्रकारात यश मिळवत अनेक खेळाडू एकदिवसीय व कसोटी क्रिकेट खेळले असल्याचे दिसून आले. आमची बेंच स्ट्रेंथ मजबूत असावी, असे आम्हाला वाटते.’बांगलादेशसाठी मालिका विजय अधिक महत्त्वाचा - महमुदुल्लाह‘प्रतिकूल परिस्थितीत मार्गक्रमण करीत असलेल्या बांगलादेश संघासाठी यजमान भारताविरुद्ध टी-२० मालिकेतील विजय महत्त्वाचा ठरेल,’ असे मत बांगलादेश संघाचा कर्णधार महमुदुल्लाह याने व्यक्त केले.महमुदुल्लाह म्हणाला, ‘बांगलादेश क्रिकेटमध्ये काय घडले याचा विचार केला तर या मालिका विजयामुळे बांगलादेश क्रिकेटचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल. भारताला पराभूत करण्यासाठी आम्हाला चांगला खेळ करावा लागेल. त्यांचा संघ मायदेशात व विदेशात चांगली कामगिरी करीत आहे. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.’ 

 

टॅग्स :रोहित शर्माटी-20 क्रिकेटबांगलादेशभारतीय क्रिकेट संघ