एडिनबर्ग: बांगला देशाऐवजी टी-२० विश्वचषकात सहभागी होणाऱ्या स्कॉटलंडने सोमवारी १५ सदस्यांचा संघ जाहीर केला. हा संघ याच आठवड्यात भारतात येणार आहे.
संघातील पाकिस्तानी वंशाचा वेगवान गोलंदाज सफयान शरीफ याच्यासह काही खेळाडूंच्या व्हीसाचा प्रश्न उपस्थित झाला असून, आयसीसी याबाबत बीसीसीआयशी सल्लामसलत करीत आहे. स्कॉटलंडचा पहिला सामना कोलकाता येथे ७ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध होईल.
स्कॉटलंड संघ: रिची बॅरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅड करी, ओली डेव्हिडसन, ख्रिस ग्रीव्ह्स, जेनुल्लाह इहसान, मायकल जोन्स, मायकल लीस्क, फिनले मॅकक्रेथ, ब्रँडन मॅकमुलन, जॉर्ज मुन्से, सफयान शरीफ, मार्क वाट, ब्रॅड व्हील.
वेगवान गोलंदाज सफयान शरीफचा जन्म इंग्लंडच्या हडर्सफिल्डमध्ये झाला. त्याचे वडील पाकिस्तानी आणि आई ब्रिटिश-पाकिस्तानी आहे. वयाच्या ७ व्या वर्षी तो स्कॉटलंडला स्थायिक झाला. पाकिस्तानी मूळ असल्याने त्याला व्हिसा मिळण्यास उशीर होऊ शकतो.