रणजी करंडक स्पर्धेतील सौराष्ट्र विरुद्ध गुजरात हा उपांत्य फेरीचा सामना चुरशीचा झाला. सौराष्टाच्या 327 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पार्थिव पटेल आणि चिराग गांधी यांनी गुजरातची खिंड लढवली होती. अखेरच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात गुजरातला विजयासाठी 121 धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे पाच फलंदाज शिल्लक होते. पटेल आणि गांधी या जोडीनं 158 धावांची भागीदारी करताना गुजरातच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. पण, अखेरच्या सत्रात सौराष्ट्रच्या जयदेव उनाडकटने सामना फिरवला. त्यानं पटेलला बाद करून गुजरातला मोठा धक्का दिला. त्यापाठोपाठ गांधी आणि अर्झान नाग्वस्वल्ला यांन माघारी पाठवून सौराष्ट्रच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या कामगिरीसह उनाडकटनं रणजी करंडक स्पर्धेतील 46 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
सौराष्ट्रने पहिल्या डावात 304 धावा केल्या, प्रत्युत्तरात गुजरातला पहिल्या डावात 252 धावाच करता आल्या. सौराष्ट्रने पहिल्या डावातील 52 धावांच्या आघाडीत 274 धावांची भर घालून गुजरातसमोर विजयासाठी 327 धावांचे लक्ष्य ठेवले. गुजरातचे आघाडीचे पाच फलंदाज अवघ्या 63 धावांवर माघारी पाठवून सौराष्ट्रने विजयाच्या दिशेनं कूच केली होती. पण, पटेल व गांधी त्यांच्या मार्गात तंबू ठोकून बसले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 158 धावांची भागीदारी केली. अखेरच्या सत्रात उनाडकटने सामन्याला कलाटणी दिली.
उनाडकटन पटेलला माघारी पाठवले. पटेलने 148 चेंडूंत 13 चौकारांसह 93 धावा केल्या. त्यानंतर गुजरातचा डाव गडगडला. गांधीही 139 चेंडूंत 16 चौकारांसह 96 धावांत माघारी परतला. त्यानंतर गुजरातचा डाव गुंडाळण्यात सौराष्ट्रला विलंब लागला नाही. उनाडकटने 56 धावा देत 7 विकेट्स घेत सौराष्ट्रला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. सौराष्ट्रला अंतिम फेरीत बंगालचा सामना करावा लागणार आहे.
![]()
जयदेव उनाडकटचा विक्रम
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या 2019-20 या मोसमात 65 विकेट्स
- 7 वेळा पाचहून अधिक विकेट्स
- रणजीच्या एका सत्रात सर्वाधिक विकेट्स घेण्यारा दुसरा गोलंदाज ( बिहारच्या आशुतोष अमनने 2018-19च्या मोसमात 68 विकेट्स घेतल्या आहेत.)
- रणजीच्या एका सत्रात सर्वाधिक विकेट्स घेणारा जलदगती गोलंदाज ( कर्नाटकच्या दोड्डा गणेशने 1998-99च्या सत्रात 62 विकेट्स घेतल्या होत्या)
- एका सत्रात सातवेळा पाचहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा तिसरा जलदगती गोलंदाज ( लक्ष्मीपती बालाजी 2002-03 आणि ए चौधरी 2018-19)
- बिशन सिंग बेदी यांचा 46 वर्षांपूर्वीचा ( 1974-75) 64 विकेट्सचा विक्रम मोडला
Breaking : टीम इंडियाच्या निवड समितीचे नवीन अध्यक्ष ठरले, द. आफ्रिका मालिकेसाठी निवडणार संघ
इंग्लंडच्या स्टार खेळाडूची हनिमून टूर; हॉटेलचं एका दिवसाचं भाडं ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!
Mumbai Indiansचे खेळाडू कोट्यवधीत खेळतात; पाहा रोहितसह कोणाला किती मिळतात!
'माझ्या पाठीशी CSK आहे म्हणून...', MS Dhoniनं सांगितलं यशामागचं सिक्रेट!
Breaking: BCCIची कॉस्ट-कटिंग; IPL 2020तील विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेत कपात
Hardik Pandyaचं ट्वेंटी-20त 37 चेंडूंत शतक, टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज
'मिताली'नंतर शेफाली! आयसीसीच्या क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान
Video : धोनीला पाहताच गळ्यात पडला सुरेश रैना, मानेवर केलं Kiss