IPL 2020 : Mumbai Indiansचे खेळाडू कोट्यवधीत खेळतात; पाहा रोहितसह कोणाला किती मिळतात!

IPL 2020 : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2020च्या लिलावापूर्वी 10 खेळाडूंना रिलीज केले होते. त्यानंतर त्यांनी सहा खेळाडूंना खरेदी केले आणि त्यात नॅथन कोल्टर नीलने ( 8 कोटी) सर्वाधिक रक्कम कमावली.

नॅथन कोल्टर नील - दोन वर्ष आयपीएल मुकल्यानंतर कोल्टर नीलसाठी मुंबई इंडियन्सने 8 कोटी मोजले.

मिचेल मॅक्लेघन - 2018च्या लिलावात किवी गोलंदाज अनसोल्ड राहिला होता. जेसन बेहरेनडॉर्फ दुखापतग्रस्त झाल्यानंतर बदली खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सने त्याला 1 कोटीत आपल्या संघात घेतले.

धवल कुलकर्णी - 75 लाख

जयंत यादव - 50 लाख

राहुल चहर - राजस्थानच्या फिरकीपटूला 2018च्या लिलावात 1.9 कोटींत मुंबई इंडियन्सने घेतले.

प्रिंस बलवंत राय - 20 लाख

दिग्विजय देशमुख - 20 लाख

शेरफाने रुथरफोर्ड - मुंबई इंडियन्सने मयांक अग्रवालची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या शेरफाने रुथरफोर्डशी अदलाबदली केली.

सौरभ तिवारी - 50 लाख

अनुकुल रॉय - 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूसाठी 20 लाख मोजले

आदित्य तरे - 2018च्या लिलावात आदित्य तरेला 20 लाखांत घेतले.

इशान किशन - 2018च्या लिलावात 19 वर्षांखालील टीम इंडियाच्या माजी कर्णधारासाठी सर्वाधिक 6.2 कोटी रुपये मोजले गेले.

सूर्यकुमार यादव - कोलकाता नाइट रायडर्सचा माजी उपकर्णधार यंदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतला आहे. त्याच्यासाठी सर्व संघांमध्ये चढाओढ रंगली होती, परंतु मुंबई इंडियन्सने 3.2 कोटींत त्याला आपलेसे केले.

क्विंटन डी कॉक - क्विंटन डी कॉकने मुंबई इंडियन्सकडून 16 सामन्यांत 529 धावा केल्या आहेत. त्याच्यासाठीही संघानं कोट्यवधी रुपये मोजले आहेत.

ट्रेंट बोल्ट - आयपीएल 2020च्या लिलावात न्यूझीलंडच्या गोलंदाजाला मुंबई इंडियन्सने ट्रेड करताना दिल्ली कॅपिटल्सकडून 2.2 कोटीत घेतले.

लसिथ मलिंगा - 2009पासून श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. 2018च्या लिलावात त्याच्यावर कोणी बोली लावली नव्हती. पण, मुंबई इंडियन्सने त्याल गोलंदाज सल्लागार म्हणून घेतले. 2019मध्ये मलिंगाला 2 कोटींच्या मूळ किमतीत ताफ्यात दाखल करून घेतले.

ख्रिस लीन - जगभरातल्या ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये धडाका उडवणाऱ्या ख्रिस लीनसाठी मुंबई इंडियन्सने केवळ 2 कोटी मोजल्यानं सर्वांना धक्का बसला. मुंबई इंडियन्स वगळता अन्य कोणत्याही संघानं लीनला घेण्यास उत्सुकता दाखवली नाही.

किरॉन पोलार्ड - वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डला 2018च्या लिलावात रिलीज केले होते, परंतु राईट टू मॅच कार्डनुसार 5.4 कोटीत पुन्हा संघात घेतले.

कृणाल पांड्या - 2 कोटींत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झालेल्या कृणाल पांड्याला संघात कायम राखण्यासाठी 2018च्या लिलावात 8.8 कोटी मोजावे लागले.

जसप्रीत बुमराह - मुंबई इंडियन्सने बुमराहला संघात कायम राखण्यासाठी 7 कोटी रुपये मोजले.

हार्दिक पांड्या - 2015च्या लिलावात 10 लाखांत मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाचा सदस्य झाला. पण, 2018च्या लिलावात मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यासाठी 11 कोटी मोजले.

रोहित शर्मा - 2018च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सनं 15 कोटी मोजून रोहित शर्माला संघात कायम राखले. विराट कोहली सर्वाधिक 17 कोटी कमावतो, तर महेंद्रसिंग धोनीला 15 कोटी मिळतात.