Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ranji Trophy : सरफराजसह मुशीर खानवर मास्क घालून मैदानात उतरण्याची वेळ, जाणून घ्या त्यामागचं कारण

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात चक्क मास्क घालून मैदानात उतरले मुंबईकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:41 IST

Open in App

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित रणजी करंडक स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या आणि महत्त्वपूर्ण टप्प्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे.  मुंबईत येथील बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकॅडमीच्या मैदानात मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना खेळवण्यात येत आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना मुंबईच्या संघाने पहिल्या डावात दिल्लीच्या संघाला अवघ्या २२१ धावांवर रोखत आपल्या पहिल्या डावाची सुरुवात केली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात चक्क मास्क घालून मैदानात उतरले मुंबईकर 

या सामन्यात क्षेत्ररक्षणावेळी सरफराज खान, त्याचा भाऊ मुशीर खान आणि फिरकीपटू हिमांशू सिंग मास्क घालून मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुंबईतील मैदानात हे चित्र पाहायला मिळाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. इथं जाणून घेऊयात त्यामागचं कारण... 

IND vs NZ 5th T20 : घरच्या मैदानात संजू सॅमसनसाठी शेवटची संधी? खेळला तर ठीक नाहीतर...

... म्हणून मुंबईकर मास्क घालून क्षेत्ररक्षण करताना दिसले

देशाची राजधानी दिल्लीतील प्रदुषणाचा मुद्दा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पण देशाच्या आर्थिक राजधानीत दिल्लीच्या संघाविरुद्ध मुंबईच्या संघातील खेळाडूंनी मास्क वापरल्याचे चित्र अनेकांना आश्चर्यचकित करून सोडणारे आहे. मैदानाच्या आसपास सुरू असलेल्या सततच्या बांधकामामुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूळ पसरली होती. प्रदूषणाची पातळी वाढल्याने सरफराज खान, मुशीर खान आणि हिमांशू सिंग यांच्यासह मुंबईच्या संघातील अन्य काही खेळाडूंनी क्षेत्ररक्षणावेळी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घालून मैदानात उतरण्याला पसंती दिल्या पाहायला मिळाले.

दिल्लीकर सनत सागवानचं शतक, मुंबई संघाकडून मोहित अवस्थीचा 'पंजा'

पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाकडून सलामीवीर सनत सागवान याने शतकी खेळीसह संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने २१८ चेंडूत ११८ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय वैभव कांडपाल ३२ (८६), आर्यन राणा १० (२३), प्रणव राजवंशी ३९ (९०) यांच्याशिवाय अन्य एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. मुंबईकडून मोहित अवस्थीनं दिल्लीचा अर्धासंघ तंबूत धाडला.  याशिवाय शम्स मुलानी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २०-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. दिल्लीचा डाव आटोपल्यावर मुंबईच्या संघानं पहिल्या दिवसाअखेर पहिल्या डावात एका विकेट्सच्या मोबदल्यात १३ धावा केल्या होत्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranji Trophy: Mumbai players wear masks; here's the reason why.

Web Summary : During a Ranji Trophy match in Mumbai, Sarfaraz Khan and other Mumbai players wore masks due to high pollution levels from nearby construction. Delhi scored 221 runs, with Sanat Sagwan hitting a century. Mohit Avasthi took five wickets for Mumbai.
टॅग्स :रणजी करंडकसर्फराज खानमुंबईदिल्ली