Viral Video : भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) सध्या खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे इंग्लंड मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून त्याची चमकदार कामगिरी. गिलने आतापर्यंत ५८५ धावा केल्या आहेत आणि त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. मालिकेत अजूनही तीन सामने शिल्लक आहेत, ज्यात तो अनेक विक्रम मोडू शकतो. मालिकेतील तिसरा कसोटी सामना (IND VS ENG 3RD TEST) १० जुलैपासून (आज) लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. त्याआधी शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) दोघांच्या अफेअरच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. त्याचे कारणही खास आहे.
गिल-साराचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
शुबमन गिल चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सारा तेंडुलकरसोबतचा त्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो आणि व्हिडीओ. हा फोटो लंडनमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान घेण्यात आला होता, ज्यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंसह अनेक दिग्गज खेळाडू देखील उपस्थित होते. ८ जुलैला युवराज सिंगच्या 'यू वी कॅन फाउंडेशन'साठी लंडनमध्ये एका चॅरिटी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विराट कोहली, ख्रिस गेल, केविन पीटरसन आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल देखील संपूर्ण टीमसह पोहोचला होता आणि सारा तेंडुलकर देखील त्याच कार्यक्रमात होती. त्यावेळी त्यांच्या एका फोटोने आणि व्हिडीओने दोघांमधील कथित अफेअरच्या चर्चांना उधाण आले. पाहा फोटो व व्हिडीओ-
व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, संपूर्ण संघ शुबमन गिलसह कार्यक्रमात येतो. त्यावेळी सारा पहिल्याच रांगते असते. त्यावेळी शुबमन गिल तिच्याकडे न पाहता निघून जातो. पण नंतर काही वेळाने सर्वजण उभे राहून टाळ्या वाजवतात तेव्हा मात्र शुबमनची साराकडे नजर जाते.
सारा आणि गिल दोघेही गप्प
सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्यातील जवळीक आणि त्यांना एकत्र पाहण्याच्या बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही, शुभमन गिलचे नाव सारा तेंडुलकरशी अनेक वेळा जोडले गेले आहे. दोघेही यापूर्वी सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत होते. पण काही महिन्यांपूर्वी शुभमन गिलने एका मुलाखतीत तो तीन वर्षांपासून सिंगल असल्याचे उघड करून अफवांना पूर्णविराम दिला.