Join us  

विराट कोहली अन् इम्रान खान यांच्यात साम्य; संजय मांजरेकरचं विधान

India vs New Zealand : भारतीय संघानं पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारतीय संघानं सर्व आघाडीत उल्लेखनीय ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 1:05 PM

Open in App

India vs New Zealand : भारतीय संघानं पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारतीय संघानं सर्व आघाडीत उल्लेखनीय कामगिरी करताना 5-0 असा दणदणीत विजय मिळवला. पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 सामन्यांत निर्भेळ यश मिळवणारा भारत हा जगातला पहिलाच संघ ठरला. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या लोकेश राहुलला मालिकावीराच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. या मालिका विजयानंतर टीम इंडियानं आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे विराट कोहलीनं सांगितले आहे. 

न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकणारा विराट हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. शिवाय त्यानं सलग 15 मालिका विजयाचा विक्रमही नावावर केला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 10 मालिका जिंकल्या असून त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ ड्यू प्लेसिस ( 9) याचा विक्रम मोडला आहे. विराटच्या या उल्लेखनीय कामगिरीवर जगभरातून कौतुक होत असताना भारताचा माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी विराटची तुलना पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी केली आहे.

संजय मांजरेकर यापूर्वीही बेताल वक्यव्यानं चर्चेत आले होते. रवींद्र जडेजाला संघात खेळवण्यापासून ते सातत्यानं टीम इंडियातील उणीवा मांडण्यापर्यंतचे ट्विट मांजरेकरनं आतापर्यंत केले आहेत. त्यांच्या या ट्विट्सला नेटिझन्सकडून सडेतोड उत्तरही मिळाले आहे. तरीही त्याचे ही विधानं थांबत नाहीत. रविवारी त्यात आणखी एक भर पडली. त्यानं चक्क विराटची तुलना इम्रान खान यांच्याशी केली.'' न्यूझीलंड दौऱ्यावरील विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं केलेली कामगिरी मला इम्रान खानच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाची आठवण करून देत आहे. संघ म्हणून आत्मविश्वासानं भरलेला. इम्रानच्या नेतृत्त्वाखाली खेळताना पाकिस्तानचा संघ पराभवातूनही विजय खेचून आणायचा. स्वतःवर विश्वास असल्याशिवाय असं होऊच शकत नाही.''

यापूर्वीही पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि अब्दुल कादीर यांनीही विराटच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले आहे. त्यांनीही कोहलीची तुलना इम्रान खानशी केली होती.  

प्रयोग केला, धडपडलो अन् जिंकलो; दोन 'सुपर' विजयांमधून काय बरं शिकलो?

विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीइम्रान खानपाकिस्तान