Join us

सानिया मिर्झा अन् शोएब मलिक यांची सात महिन्यांनी झाली भेट; पाकिस्तानी क्रिकेटपटूनं पोस्ट केला Video

कोरोना व्हायरलमुळे क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या होत्या, त्यात लॉकडाऊन असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकही बंद होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 16:22 IST

Open in App

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा ( Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक ( Shoaib Malik)  यांची अखेर सात महिन्यांनी भेट झाली. कोरोना व्हायरसमुळे सानिया व शोएब आपापल्या देशांत अडकले होते. सानिया हैदराबादमध्ये तिच्या कुटुंबीयांसह होती, तर तिचा पती शोएब त्याच्या घरच्यांसह सिआलकोट, पाकिस्तान येथे होता. त्यानंतर तो इंग्लंड दौऱ्यावर गेला आणि अखेर दुबईत दोघांची भेट झाली.   

IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या जेतेपदासाठी सज्ज; पण 'ही' कमकुवत बाजू करू शकते घात! 

भारतीय वायुसेनेत राफेल विमान दाखल; MS Dhoniने केलं अभिनंदन, सांगितलं फेव्हरिट विमानाचं नाव

कोरोना व्हायरलमुळे क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या होत्या, त्यात लॉकडाऊन असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकही बंद होती. त्यामुळे सानिया व शोएब यांना भेटता आलं नव्हतं. आता लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणली, त्यामुळे सानिया मुलगा इझानसह दुबईत दाखल झाली. इंग्लंड दौरा आटपून शोएबही दुबईत दाखल झाला होता. इतक्या दिवसानंतर मुलाला भेटणाऱ्या शोएबनं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला...

पाहा व्हिडीओ.. जून महिन्यात पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( PCB) मलिकला त्याच्या कुटुंबाला भेटण्याची मुभा दिली होती, परंतु लॉकडाऊन नियमांमुळे त्याला पाकिस्तानातून दुबई प्रवास करता आला नाही.    

सानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण 

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं 2010मध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकशी विवाह केला. दोन देशांतील सीमांचा वाद विसरून शोएबशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला, याचा खुलासा सानियानं नुकत्याच एका मुलाखतीतून केला. सानियानं नुकतंच पाकिस्तानची क्रीडा पत्रकार झैनाब अब्बास हिच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या गप्पांचा व्हिडीओ शोएबनं पोस्ट केला. त्यात सानियानं खुलासा केला. शोएबच्या एका गोष्टीचा प्रचंड राग येत असल्याचा खुलासा सानियानं केला आहे.

सानियानं सांगितलं की,''आम्ही जेव्हा गप्पा मारतो, तेव्हा शोएब जास्त बोलत नाही. विशेषतः आम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीवर वाद किंवा तत्सम चर्चा करतानाही तो काहीच बोलत नाही. त्याला बोलतं करण्यासाठी मला वस्तूंची तोडफोड करावासं वाटतं.''

यावेळी तिची एक सवय शोएबलाही आवडत नसल्याचं, सानियाने सांगितली. ''मी अधीर आहे आणि कदाचित ही गोष्ट त्याला आवडत नसावी,''असं ती म्हणाली. सानियाला तुझं पहिलं क्रश काय, असं विचारलं असता तिनं लगेच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं नाव घेतलं. सानियानं सांगितलं की,''काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर मला शोएबनं लग्नाची मागणी घातली. त्यानं भारतात येऊन माझ्या घरच्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तुझं उत्तर हा असेल तर मला सांग, असं तो म्हणाला होता.''

शोएबनं गुडघ्यावर बसून सानियाला प्रपोज केलं होतं. अशा फिल्मी स्टाईलनं प्रपोज करणाऱ्यांपैकी तो नाही. पण, तरीही त्यानं सानियासाठी असं केलं. हाच सच्चेपणा सानियाला भावला. ''शोएबच्या बोलण्यात मला खरेपणा जाणवला. तो चांगुलपणाचा आव आणत नसल्याचे मला समजले आणि म्हणून मी त्याला होकार दिला,''असे सानियानं सांगितलं. 

शोएबशी लग्न होण्यापूर्वी सानियानं 2009मध्ये लहानपणीचा मित्र सोहराब मिर्झा याच्याशी साखरपुडा केला होता. पण, दोघांचं नातं तुटलं अन् तिच्या आयुष्यात शोएब आला. 5 महिने एकमेकांना डेट केल्यानंतर 12 एप्रिल 2010मध्ये दोघांनी विवाह केला. आता या दोघांना इझान नावाचा मुलगा आहे. 

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिक