Join us  

Big News : Corona Virus च्या संकटात पाकिस्तानला मोठा धक्का; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्ती

कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 3:04 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिक एका वर्षांनी पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. युरो लिग, ला लिगा, इंग्लिश प्रीमिअर लीग आदी मोठ्या फुटबॉल स्पर्धाही रद्द झाल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका पुढे ढकलली. त्यात इंडियन प्रीमिअर लीगवरही अनिश्चिततेचं सावट आहे. अशात क्रिकेट स्पर्धा कधी सुरू होतील, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. अशात एका दिग्गज खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली आहे.

पाकिस्तानची स्टार खेळाडू साना मिर हिनं शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पाकिस्तान महिला संघाचे 15 वर्ष तिने प्रतिनिधित्व केले आहे. तिनं पाकिस्तानकडून 226 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 34 वर्षीय सानाच्या नावावर 120 वन डे आणि 106 ट्वेंटी-20 सामने आहेत.

डिसेंबर 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑक्टोबर 2018मध्ये तिनं आसीसीच्या महिला वन डे गोलंदाजांत अव्वल स्थान पटाकवे. तिनं वन डेत 151 विकेट्स घेतले आहेत आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या महिला गोलंदाजांत ती चौथ्या क्रमांकावर आहे. विस्डन महिला संघातही तिनं स्थान पटकावले होते.  सानानं 137 सामन्यांत पाकिस्तान संघाचे नेतृत्वही सांभाळले. निवृत्तीची घोषणा करताना तिनं पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे आभार मानले.

ती म्हणाली,’’पाकिस्तान क्रिकेट मंडळानं मला 15 वर्ष देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, यासाठी आभार. राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणे, हे मी भाग्य समजते. मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार.’’

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli अन् ABD चा पुढाकार; कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करणार

विराट कोहली RCBची साथ सोडणार? टीम इंडियाच्या कर्णधाराचं मोठं विधान

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी Good News: 'विराट'सेनेचा ऑगस्टमध्ये परदेश दौरा?

Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!

स्टार फुटबॉलपटूच्या आईचं 22 वर्षीय बॉयफ्रेंडसोबत Break Up; कारण ऐकून बसेल धक्का 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापाकिस्तान